शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा
बांदा : चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बांदा- आळवाडा बाजारपेठेत 30 पाणी घुसले होते . या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे भेट देत तत्काळ ५० हजारांची मदत दिली . तसेच तहसीलदार श्रीनिवास पाटील यांना नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले . यावेळी बांदा- शेर्ले पुलाची त्यांनी पाहाणी केली . पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यासाठी लागणारा आवश्यक निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली , तर वाफोली येथे घराची भिंत कोसळून नुकसान झालेल्या परब कुटुंबीयांना रोख १० हजारांची मदत दिली . शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे मुसळधार बांदा - आळवाडा बाजारपेठेत काही दुकानांत पाणी घुसून नुकसान झाले . आज मंत्री केसरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना प्रथम त्यांनी बांदा येथे भेट दिली . यावेळी बांदा सरपंच अक्रम खान , ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर , माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार , उद्योजक संदेश पावसकर , प्रीतम हरमलकर , भाऊ वाळके , पांडुरंग नाटेकर , सुनील धामापूरकर , सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे , तलाठी वर्षा नाडकर्णी , भैया गोवेकर अ उपस्थित होत...