बांद्यात दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तीपूर्ण निरोप
बांदा:गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पूजन झालेल्या लाडक्या बाप्पाला दीड दिवसांनी बांद्यात भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.येथील तेरेखोल नदीपात्रात पारंपारिक पद्धतीने होडीतून गणपती बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
'गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...'च्या जयघोषात बाप्पांचा दीड दिवस पाहुणचार केल्यानंतर गणेश भक्तांनी वाहनातून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणल्या होत्या.आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.यंदा पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने लहान मुले व महिलाही मोठ्या संख्येने विसर्जन स्थळी आल्या होत्या.

Comments
Post a Comment