बांद्याच्या 'बाप्पा' मंडळाचे कार्य समाजाला आदर्शवत:प्रमोद कामत
बांदा येथील 'बांद्याचा बाप्पा' हा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.कोरोना काळ,पूरपरिस्थिती,जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांना मदत करणाऱ्या या मंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे गौरवोद्गार माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी काढले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने मंडळाचे क्रियाशील कार्यकर्ते,डेकोरेटर, मूर्तिकार आदींचा सन्मान येथील विठ्ठल रखुमाई सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमोद कामत बोलत होते.व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष साईप्रसाद काणेकर,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.श्वेता कोरगावकर, सौ.अंकिता स्वार,सौ.मंगल मयेकर,मंडळाचे ओंकार नाडकर्णी, राजेश विरनोडकर,आशुतोष भांगले, प्रीतम हरमलकर, सर्वेश गोवेकर,अक्षय नाटेकर, अक्षय मयेकर,अर्णव स्वार,भाऊ वाळके यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आशुतोष भांगले यांनी सांस्कृतिक वारसा जपताना श्री गजाननाला आवडणाऱ्या गोष्टी हे मंडळ करत असून परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत.विशेष म्हणजे मंडळाच्या लहान मुलांपासून ते अगदी पन्नाशीच्या कार्यकर्त्यांकडून गणपतीची सेवा केली जात असल्याचे सांगून युवा पिढीही भजन क्षेत्रात कार्यरत असल्याचा उल्लेख केला.
यावेळी विवेक आंबिये, मूर्तिकार गुळेकर,हलता देखावा साकारणारे मंगेश धारगळकर, सजावटीचा भार उचलणारे सिद्धेश महाजन यांचा मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.यावेळी कोरोना काळात केलेली मदत,घेण्यात आलेली रक्तदान शिबिरे यांची माहिती राकेश केसरकर यांनी दिली.

Comments
Post a Comment