माजगाव येथे गवा रेडा अचानक आला रस्त्यावर;कार आदळल्याने माय-लेक जखमी
सावंतवाडी: गव्याने कारला धडक दिल्याने माजगाव येथे झालेल्या अपघातात तळवडे येथील आई व मुलगा जखमी झाले, तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात आज सात वाजण्याच्या सुमारास माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी समोर सावंतवाडी-शिरोडा
राज्यमार्गावर घडला. जखमींना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिता अशोक कामत (वय ६५) असे जखमीचे नाव आहे. तर विश्वनाथ कामत याला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान गव्याकडून अशा प्रकारे अचानक येण्याने अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ओटवणे येथे आठवड्याभरापूर्वी असाच अपघात घडला होता. त्यामुळे वनविभागाने योग्य ते नियोजन करावे व थेट रस्त्यावर येणाऱ्या गव्यांना जंगलात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

Comments
Post a Comment