झाराप येथील रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल वाहनधारक, ग्रामस्थांकडून उपहासात्मक आभार
कुडाळ:झाराप रेल्वे स्टेशन व झाराप येथील रेक पॉईंट यांना जोडणारा एक किमी रस्त्याची अक्षरशः दुर्दशाच झाली आहे. त्यामुळे वैतागलेल्या स्थानिक वाहन धारक व ग्रामस्थांनी सर्वच लोकप्रतिनिधींचे अतिशय गोड भाषेत व निशेधात्मक विशेष आभार मानले आहेत. गेले तीन वर्षे या रस्त्याच्या देखभा
ल दुरुस्तीकडे पुर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. झाराप तिठा येथे तर तिन ठिकाणी मोठ मोठी डबकीच तयार झाली आहेत . अशा या भयावह मार्गावरूनच अनेकांना प्रवास करावा लागत. रेल्वे ब्रिज व झाराप तिठा अशा दोन ठिकाणी अशी अवस्था झाली आहे. झाराप रेल्वे स्टेशन ब्रिजला जोडणारा सुमारे दोनशे मीटर रस्ता रेल्वेच्या अखत्यारित येत आहे. त्यामुळे मैलकुली कामगारही याच्या डागडुजीकडे कानाडोळा करतात व रेल्वे स्टेशन येथील स्टेशन मास्तर यांचे याबाबत लक्ष वेधले असता येथील स्टेशन मास्तर कणकवली व रत्नागिरी येथील अधिकार्यांचे बोट दाखवून गप्प बसत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी याठिकाणी गोड भाषेतील निषेधवजा फलक लावले आहेत. यानंतरही याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास स्थानिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारित आहेत.

Comments
Post a Comment