४८ लाखांच्या दारुसह कंटेनर जप्त;कुडाळ येथील एकजण ताब्यात

  कणकवली:सहाचाकी सील लावलेल्या कंटेनरमधून छुप्या पद्धतीने करण्यात येत असलेली दारूची वाहतूक राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने उघडकीस आणली असून कणकवलीनजीक ओसरगाव पोस्ट बसथांब्याजवळ 48,51,480/ रु. किमतीचा गोवा बनावटीचा मद्यासाठा जप्त केला आहे.


राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने ओसरगाव पोस्ट बसथांब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने वाहतूक होणारा सुमारे 48,51,480/ रु. किमतीचा गोवा बनावटीचा मद्यासाठा जप्त केला आहे.. या मद्यसाठयाची वाहतूक एका सहाचाकी सील लावलेल्या कंटेनरमधून छुप्या पद्धतीने करण्यात येत होती. या प्रकरणी विक्रांत विवेक मलबारी, (वय 33 वर्षे रा. ओरोस, ख्रिश्चनवाडी ता. कुडाळ )या इसमास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचे 450 बॉक्स, बिअरचे 63 बॉक्स व वाहनाच्या किमतीसह एकूण 55,11,480/-रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम निरीक्षक संतोष पाटील, जमदाजी मानेमोड, जवान शिवशंकर मुपडे, रणजित शिंदे, स्नेहल कुवेसकर मदतनीस गोट्या सुर्वे, सला खान यांचेसह भरारी पथक, सिंधुदुर्ग यांनी या कारवाई दरम्यान मदत केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक संतोष पाटील हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे