शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना निवेदन

 सावंतवाडी:माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर संघटनेतर्फे निवेदन देऊन तात्काळ शिक्षकेतरांची नोकर भरती सुरू करावी अशा आशयाचे निवेदन देऊन  सविस्तर चर्चा दीपकभाई केसरकर यांच्याशी करण्यात आली आहे.



महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचे विविध प्रश्न प्रलंबित असताना गेल्या कित्येक वर्षापासून नोकर भरती बंद आहे. त्यामुळे प्रशालेतील उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे  तसेच संस्थाचालक  यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . मुख्याध्यापकांना ही त्रास सहन करावा लागत आहे  शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या समस्या संदर्भात विविध ठिकाणी आंदोलने ,मोर्चे  धरणे आंदोलने केलेली असताना शासनाला जाग यावी  म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय  शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे खालील विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान  दीपकभाई केसरकर यांना देण्यात आले आहे . प्रलंबित मागण्या खालील प्रमाणे१) महाराष्ट्र राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचारी यांना दुसरी कालबद्ध पदोन्नती चोवीस वर्षानंतर मिळणारी मंजूर करणे २) सातवा वेतन आयोगातील मंजुरीनुसार कर्मचारी यांना मिळणारे आश्वासित प्रगती योजना दहा, वीस तीस ok लागू करणे३) सेवानिवृत्त  कर्मचारी यांचे  भविष्य निर्वाह निधी रोखीकरण व अर्जित रजा रोखीकरण प्रस्ताव मंजूर व्हावेत

 ४) सन २००५  नंतर संस्थेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी५) संस्थेने नेमलेल्या शिपाई व लिपिक यांच्या पदास तात्काळ मान्यता मिळावी ६) शिक्षकेतर कर्मचारी भरती चिपळूणकर समिती नुसार सुरू करावी ७) शिपाई यांना देय असणारा गणवेश व  धुलाई भत्ता मासिक  वेतनातून मिळावा ८) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शासनाने ठोक ५००० रुपये मानधनावर भरतीस मान्यता दिली आहे ती रद्द होऊन त्यांच्या भरतीस वेतनश्रेणीवर मान्यता मिळावी ९) अनुकंपा धारक पाल्यांना ताबडतोब त्यांच्या भरतीस तात्काळ मंजुरी मिळावी १०) अध्यापक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मासिक वेतन कधीच वेळेत मिळत नाही ते दरमहा मिळावे तसेच त्या कर्मचाऱ्यावर होत असलेला  वारंवार अन्याय दूर करावा११) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तीनशे दिवसाच्या अर्जित रजा रोखीकरणास शासनाचे मंजुरी दिली आहे ती ४०० दिवसापर्यंत वाढवून मिळावी १२) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये घड्याळी तासीकेवर नेमलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायम मान्यता मिळाव्यात  १२) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील अधीक्षक व इतर पदे तात्काळ भरावीत १३) शिक्षणाधिकारी माध्यमिक व वेतन पथक कार्यालयामध्ये चालू असलेली हेरगिरी ताबडतोब थांबवावी अशा विविध मागण्यांचे निवेदन मान. दीपकभाई केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री यांना देण्यात आले निवेदन देताना शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर म्हणाले की कर्मचारी बांधवांच्या समस्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले.  सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने नूतन शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल राणे, जिल्हा सचिव गजानन नानचे, ज्येष्ठ सल्लागार काका मांजरेकर, शाबी तुळसकर, गोविंद कानसे, राजेंद्र शेटकर, निलेश पारकर, प्रवीण शिर्के, अनिल जाधव, गजानन गवस, पंढरी आचरेकर, विनायक पाटकर, कैलास कडू, गजानन मांजरेकर, बाळकृष्ण नाईक, रुपेश खोबरेकर, प्रदीप सावंत , अंकुश कारोटे , अनिल जाधव आणि मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे