लाडक्या सिंधुदुर्ग राजाचे थाटात विसर्जन...!ही शान कोणाची सिंधुदुर्ग राजाची ह्या घोषणेने दुमदुमला परिसर*
माजी खासदार निलेशजी राणे व राणे परिवाराच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणारा सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात पार पडली गेली दहा दिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला विविध सामाजिक, संस्कृती कार्यक्रम राजाच्या दरबारात घेण्यात आले.आज कुडाळ पोस्ट ऑफिस म्हणजेच सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडप इथून सुरवात झाली कुडाळ पोस्ट ऑफिस, जिजामाता चौक,गांधी चौक मार्ग भैरवाडी, काळप नका,ते पावशी तलाव इथं पर्यंत फटाक्यांच्या आतिषबाजी सह पार पडली व सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान कुडाळ येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा एक वेगळाच उत्साह पाहिला मिळाला.
सकाळी ठीक 11 वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते राजाची उत्तर पूजा सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडपात संपन्न झाली पावशी येथील तलाव ह्या ठिकाणी सिंधुदुर्ग राजाचे थाटात विसर्जन झाले.
त्यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.संध्या तेरसे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते,ता अध्यक्ष विनायक राणे,माजी नगराध्यक्ष ओंकार तेली,युवा नेते आनंद शिरवलकर,ओबीसी जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर,जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, संदीप मेस्त्री,दामू तोडणकर,रुपेश कानडे,पप्या तवटे,राकेश कांदे,नगरसेवक अभिषेक गावडे,ऍड राजीव कुडाळकर,निलेश परब,गणेश भोगटे,नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, कु.चांदणी कांबळी,विश्वस्त राकेश नेमळेकर,माजी नगरसेवक आबा धडाम,सुनिल बांदेकर,सौ साक्षी सावंत,रेखा काणेकर, नागेश नेमळेकर,रुपेश बिडये, साईनाथ म्हाडदळकर,राजवीर पाटील,मुना दळवी,चंदन कांबळी,साईनाथ दळवी,स्वरूप वाळके,प्रथमेश कुडाळकर,आकाश पिंगुळकर,प्रथमेश परब,संदेश सुकळवाडकर,अक्षय बाईत,आनंद सूर्यवंशी फोटोग्राफर धनंजय पानवलकर, अजय कुडाळकर सह सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठिन पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment