दुर्मिळ किंग कोब्रा साप अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी सर्पमित्र वन विभागाच्या ताब्यात

 दोडामार्ग:दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावामध्ये काल सायंकाळी पकडलेला दुर्मिळ किंगकोब्रा प्रजातीचा साप अवैधरित्या बाळगून त्याचे चित्रीकरण करणे, प्रदर्शन करणे यासाठी दोडामार्ग येथे राहणारा काथाकथीत सर्पमित्र राहुल विजय निरलगी याला वनविभागाने ताब्यात घेतले. यामुळें तालुक्यातील सर्पमित्रात खळबळ उडाली आहे


सदरच्या घटनेमध्ये ताब्यात घेण्यात आलेला आरोपी राहुल विजय निरलगी रा.दोडामार्ग हा सर्प इंडिया या NGO च्या अंतर्गत काम करत असून गेली दोन-तीन दिवस तो पाळीये येथे दिसून येणाऱ्या किंगकोब्रा सापाच्या पाळतीवर होता. सदर किंगकोब्रा सापाला पकडण्यापूर्वी वनविभागाला पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे हे माहिती असूनदेखील त्याने दोडामार्ग येथील स्थानिक वन अधिकारी-कर्मचारी यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तो साप अवैद्यरित्या पकडून ताब्यात ठेवला. दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यलयाला सायंकाळी याची गुप्त माहिती मिळताच सदर तरुणाची व त्याच्या ताब्यात असलेल्या किंगकोब्रा सापाचा शोध सुरू झाला. आरोपी राहुल नीरलगी याचेशी वन अधिकारी व कर्मचारी यांनी फोन वर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला परंतु रिंग होऊन देखील त्याने कुणाचाही फोन उचलला नाही किंवा दुर्मिळ किंगकोब्रा वन विभागाच्या ताब्यात दिलेला नाही. आज सकाळी आरोपी याला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यलयात चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून देण्यात आलेली उडवाउडवीची उत्तरे व सदर गुन्ह्यात फोटो-व्हिडीओ काढण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन त्याने लंपास केला असल्याचे निदर्शनास आले. सदर किंगकोब्रा सापाला अवैद्यरित्या बाळगून त्याचे पुरावे नष्ट केल्यामुळे सायंकाळी त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 च्या तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये ज्याप्रमाणे वाघ, बिबट, गवा या प्राण्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे त्याच प्रमाणे दुर्मिळ आशा किंगकोब्रा सापाला देखील संरक्षित करण्यात आलेले आहे. त्यानुसार या दुर्मिळ प्रजातीच्या सापाला अवैद्यरित्या ताब्यात ठेवण्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तरी वन विभागामार्फत सर्व सर्पमित्रांना आवाहन करण्यात येते की वन विभागाला काळविल्याशिवाय असे दुर्मिळ साप अवैधरित्या आपल्या ताब्यात बाळगण्यात येऊ नयेत.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे