दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचा 'गुरु सेवा' पुरस्काराचे वितरण आता १० सप्टेंबर रोजी
सावंतवाडी : शहरातील सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'गुरु सेवा आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२२ चा वितरण सोहळा शनिवार दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंट, बस स्थानकासमोर, आमदार निवास, सावंतवाडी या ठिकाणी आयोजित
करण्यात आला आहे. यापूर्वी सदर कार्यक्रम ११ सप्टेंबर रोजी होणार होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम शनिवार दिनांक १० रोजी आयोजित केला आहे.
दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. त्याचा वितरण सोहळा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. ज्या शिक्षक - शिक्षिकांनी विविध उपक्रम राबवून विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला, कोविड काळातही उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्य केले आहे, अशा माध्यमिक, प्राथमिक, बालवाडी शिक्षक - शिक्षकांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.
तरी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी तसेच शिक्षणप्रेमी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन दीपकभाई केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment