मुसळधार पावसामुळे बांदा तेरेखोल नदीत पुरसदृश्य परिस्थिती; मच्छिमार्केट आळवाडा रस्ता पाण्याखाली

 बांदा:रात्रभर संततधारपणे कोसळत असलेल्या पावसाने तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरातील आळवाडी भागात शिरले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शहरात पुरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून सरपंच अक्रम खान, तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ पुरस्थितीची पाहणी करत व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील आळवाडी -शिवाजी चौक रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील अनेक दुकानात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याचा वेग वाढत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे