बांदा शहर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस;बांदा दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे गुडघाभर पाणी

 बांदा: शहर व परिसराला आज सायंकाळी उशिरा ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग २ तास पाऊस कोसळल्याने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. शहरात गटाराचे पाणी तुंबल्याने गडगेवाडी येथे बांदा दोडामार्ग रस्ता पाण्याखाली गेला होता. येथील वाहतूक तब्बल अर्धा तास बंद होती.


आज सायंकाळी पावसाने कहर केला. सलगपणे मुसळधार पाऊस कोसळल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सर्वच रस्ते जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वीज पुरवठा खंडित झाला होता.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे