केरळच्या धर्तीवर 'बटरफ्लाय पार्क' ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल:ना.दीपक केसरकर
आंबोली:केरळच्या धर्तीवर उभारण्यात आलेले आंबोली येथील बटरफ्लाय पार्क पावसाळ्यानंतर सुुरु करण्यात येणार आहे. तसेच त्याच परिसरात प्रसिध्द शास्त्रज्ञ मार्सेलिन अल्मेडा यांनी संग्रहित केलेले पानाचे विविध प्रकाराचा अभ्यास घडविणारे हार्बेरियम सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण तथा पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.
दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीने महात्वाचे असलेल्या आंबोली येथील अन्य पर्यटन प्रकल्प लवकरच सुरू केले जातील, त्यासाठी आवश्यक असलेला निधी आपण तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही श्री.केसरकर म्हणाले.
आंबोली येथील पर्यटन प्रकल्पांना श्री. केसरकर यांनी आज भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, सरपंचा सौ. सावित्री पालयेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. केसरकर पुढे म्हणाले, या ठिकाणी उभारण्यात आलेले बटरफ्लाय पार्क कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यात फुलपाखरे यावीत यासाठी पाण्याचे छोटे फवारे लावण्यात येणार आहे. अशा प्रकारचे पार्क केरळमध्ये आहे. त्यामुळे तेथील मॉडेल सिलेक्ट केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू करण्यात येेणार आहे. बुस्ट प्लान्टचे मेंटेनन्स करण्यात येणार आहे, स्वच्छता करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर हे पार्क सुरू करण्यात येणार आहे.

Comments
Post a Comment