जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन
सावंतवाडी :महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ यांच्यावतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना शनिवारी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजय शिंदे, कार्यवाह विजय मयेकर,माजी अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर व विविध पदाधिकारी शिक्षक कर्मचारी बांधव उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या शिक्षण मंत्र्यांसमोर उपस्थित केल्या.दरम्यान शैक्षणिक क्षेत्रातील शासनस्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Comments
Post a Comment