सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदातर्फे स्वरसंध्या
बांदा:सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात अक्षय नाईक, विठ्ठल केळुस्कर, नेहा आजगावकर हे गायन करणार आहेत. तबला साथ आदित्य वालावलकर, हार्मोनियम निलेश मेस्त्री, ऑक्टॉपड अश्विन जाधव, पखवाज प्रदीप वाळके, कीबोर्ड महेंद्र मांजरेकर हे संगीत साथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रफुल्ल वालावलकर करणार आहेत. येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ रसिकानी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी केले आहे.

Comments
Post a Comment