शेतकऱ्यांच्या भातशेतीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्या:काणेकर
गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातच तेरेखोल नदीला आलेल्या पुरामुळे हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे.
पाऊस सुरू असल्याने शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने या शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले भाताचे पीक कुजून जात असून त्यांचे नुकसान होत आहे.त्यामुळे कृषी विभागाने व महसूल विभागाने याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ जास्तीतजास्त मदत मिळवून द्यावी अशी मागणी शिवसेना बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Comments
Post a Comment