सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लाभार्थ्यांना धनादेश
सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने राबवली जाते. या योजनेअंतर्गत तुळस येथील अपघाती निधन झालेले महेश वसंत साटम यांची वारस पत्नी ममता साटम यांना सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दोन लाख रक्कमेचे
विमा पत्र बँकेच्या होडावडा शाखेत सुपूर्द करण्यात आले.
यावेळी शाखाव्यवस्थापक सुनिल जाधव व बँक कर्मचारी उपस्थित होते. वेंगर्ले तालुक्यातील तुळस गावातील महेश सावंत यांचे विहीरीत पडून निधन झाले होते. मयताच्या नांवे सिधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा उतरविण्यात आला होता. सोमवारी मयताच्या वारसास जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दोन लाख रक्कमेचे विमा पत्र सुपूर्द करण्यात आले.

Comments
Post a Comment