सावंतवाडी वैश्यवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ५ हजार ५५६ मोदकांचा नैवेद्य

 सावंतवाडी : शहरातील वैश्य वाडा हनुमान मंदिर येथे श्री हनुमान मंदिर उत्सव समिती वैश्यवाडा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सावंतवाडी तर्फे २१ दिवसांच्या सार्वजनिक बाप्पा चरणी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्त्रमोदक नैवेद्य अर्पण सोहळा पार पडला.


अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त या सोहळ्याच आयोजन करण्यात आला होत. यावेळी तब्बल ५ हजार ५५६ मोदकांचा नैवेद्य श्री गणेशाला अर्पण करण्यात आला. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, खवा मोदक आदी विविध प्रकारचे हजारो मोदक बाप्पाला अर्पण करण्यात आले.दरवर्षी हा सोहळा या ठिकाणी पार पडतो. यावेळी मोदकांचा नैवेद्य अर्पण करत नवस देखील पूर्ण केला जातो. पुजा, महाआरतीनंतर गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहात या सोहळ्यात सहभाग घेतला होता. यावेळी वैश्यवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे