बांद्याच्या बाप्पा चरणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर झाले लीन
बांदा:राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना.दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर 'बांद्याचा बाप्पा'चे दर्शन घेतले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर बांदा येथील गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी ना.दीपक केसरकर हे बांदयात आले होते.यावेळी त्यांनी बांद्याचा बाप्पा मंडळाचे व त्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष साईप्रसाद काणेकर,ओंकार नाडकर्णी,सर्वेश गोवेकर,निखिल मयेकर,प्रथमेश गोवेकर,संकल्प केसरकर,अक्षय नाटेकर,अक्षय मयेकर,सुनील नाटेकर यांच्यासह बबन राणे,गणेशप्रसाद गवस,प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment