मुंबई-गोवा महामार्गावर कार उलटली शेतात;दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला
सावंतवाडी:मुंबई गोवा महामार्गावर झाराप पत्रादेवी बायपासलगत नेमळे कांबळेवीर येथे ब्रिजलगत टाटा टियागो कार पलटी होऊन अपघात झाला.
ही कार पलटी होऊन शेतात पडली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. सदरचा चालक दोडामार्ग कुडासे येथील असल्याचे समजते.हा अपघात घडला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित लोकांचा काळजाचा ठोका चुकला.मात्र काही क्षणात चालक सुखरूप बाहेर आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Comments
Post a Comment