नवाबाग फिशिंग व्हिलेज राज्यात आदर्श फिशिंग व्हिलेज ठरेल:ना.केसरकर

 वेंगुर्ला : नवाबाग फिशिंग व्हिलेजसाठी प्रस्तावित असलेल्या १९ गुंठे शासकीय जागेची राज्याचे शिक्षणमंत्री तथा सिधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी शुक्रवारी फिशरीजच्या अधिका-यांसोबत पहाणी केली. नवाबाग फिशिंग व्हिलेज राज्यातील एकमेव आदर्श फिशिंग व्हिलेज ठरेल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.


नवाबाग येथील ब्रेक वॉटरचे काम एक महिन्यात सुरु होईल. मच्छिमारांना मासे वाळविण्यासाठी चांदा ते बांदा योजनेमधून सोलर देण्यात येतील अशीही माहिती श्री.केसरकर यांनी दिली. तर नवाबाग बंधा-यावर बांधण्यात आलेला पादचारी मार्ग पुढे झुलत्या पुलापर्यंत नेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त रविद्र मालवणकर, परवाना अधिकारी चिन्मय जोशी, तहसिलदार प्रविण लोकरे, पोलिस निरिक्षक अतुल जाधव, नायब तहसिलदार संदिप पाणमंद, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, उपसरपंच गणपत केळुसकर, मच्छिमार सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कुबल, रामचंद्र आरावंदेकर, प्रकाश मोटे, दशरथ तांडेल, संजू कुबल, हनुमंत कासकर, देविदास मोठे, बाळू कुबल, नाना सावंत, दादा केळुसकर, सुधाकर वेंगुर्लेकर, अशोक खराडे, सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे