भारतात राज्य माध्यमिक शालेय शिक्षणात अग्रेसर राहील:ना.केसरकर

 सावंतवाडी : शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र राज्य पुढारलेले आहे . परंतु प्रशासकीय दृष्ट्या आवश्यक असलेली पूर्तता होत नसल्याने केंद्र सरकारच्या रँकमध्ये राज्य नवव्या क्रमांकावर आहे . मात्र यापुढे राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षणात भारतात अग्रेसर राहील , असे काम केले जाईल असा आशावाद राज्याचे शालेय शिक्षण , मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला .


 नाम . दीपक केसरकर गुरूसेवा शिक्षक पुरस्काराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २७ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला . यावेळी मंत्री केसरकर बोलत होते . यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे , महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि . न . लांडगे ,केसरकर मित्र मंडळाचे भरत गावडे , विठ्ठल कदम , प्रा . रुपेश पाटील , गुरूनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते . मंत्री केसरकर पुढे म्हणाले , विद्यार्थी बुद्धिमान आहेत . राज्याने भारतात शैक्षणिक दृष्ट्या क्रमांक एक वर असावे . त्यासाठी राज्याच्या शैक्षणिक दर्जा किती श्रीमंत आहे , हा महत्त्वाचा ठरतो . शिक्षणाचे पवित्र काम गुरुजनांनी करताना विद्यार्थ्यांना आई • वडिलांमध्ये सकारात्मक विश्वास निर्माण घेतलकेला पाहिजे . - केसरकर म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रशासकीय दृष्ट्या चांगले गुण मिळाले पाहिजे . त्यामुळे केंद्र सरकारच्या निकषाचे पालन करून प्रस्ताव पाठविले गेले पाहिजे तरच रँक मध्ये महाराष्ट्र शासन येईल . महाराष्ट्राने शैक्षणिक आघाडी पाहीजे . राज्य किती श्रीमंत आहे , यापेक्षा गुणवत्ता जास्त आहे . उत्तीर्ण होण्याची व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची टक्केवारी शंभर आहे . सिंधुदुर्ग , रत्नागिरीमध्ये व्यावसायिक शाळा नाहीत . गावागावातील ग्रामस्थांनी आपल्या भावना आणि आर्थिक गुंतवणूक करून शाळा उभारल्या आहेत . त्यामुळे शाळा , विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा चांगला समन्वय निर्माण होतो . दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे , विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात , दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांसोबतच वह्या देण्याचा मानस आहे , तीन टप्प्यांमध्ये हे दिले जाईल . आठवीपासूनच विद्यार्थ्यांना कौशल्य विकास शिक्षण दिले पाहिजे , नवीन शैक्षणिक धोरण त्याचा बदल करण्यात येईल . माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले , सावंतवाडी संस्थानचे राजे रामराज्यचा बहुमान देणारे महात्मा गांधीजी हे सावंतवाडी संस्थांनमध्ये विश्रांतीसाठी थांबले होते . बापूसाहेब महाराजांचा एखादा धडा पाठ्यपुस्तक द्यायला हवा . यावेळी महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि . न . लांडगे म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करून त्यांच्या आज सन्मान होत आहे हा आदर्श महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे शालेय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांबद्दल आदर राखला . गुरु सेवा पुरस्कार दिला आहे चेतना प्रेरणा आणि आदर निर्माण करणारे हे काम आहे . यावेळी भरत गावडे विठ्ठल कदम यांनी सर्वांचे स्वागत केले . भरत गावडे यांनी सूत्रसंचालन , विठ्ठल कदम यांनी आभार प्रदर्शन केले . प्रा . रुपेश पाटील , महादेव सातपुते आदींनी संयोजन केले .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे