उर्दू माध्यम रिक्त पदे भरताना जातीची अट शिथिल करावी
उर्दू माध्यम रिक्त पदे भरताना बिंदू नामवलीत प्रवर्गानुसार उमेदवार उपलब्ध होत नसल्याने जातीची अट शिथिल करून रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भराव्यात तसेच यामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले.
सावंतवाडी येथील ना.केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज ना.दीपक केसरकर यांची भेट घेण्यात आली.यावेळी संघटनेच्या वतीने ना.केसरकर यांचा सत्कार करत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उर्दू माध्यम पदे रिक्त आहेत.त्यामुळे आंतरजिल्हा बदली होऊनसुद्धा वर्षानुवर्षे शिक्षकांना आपल्या स्व-जिल्ह्यात जाता येत नाही.कारण १० टक्के रिक्त पदांची अट आहे.याकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.त्यामुळे उर्दू माध्यम पदे भरताना आरक्षित पदावर खुल्या प्रवर्गातून उमेदवार भरती करून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सईद बटवाले, सचिव सिराज सोलकर,राज्य संघटक सुलेमान बेग,विभागीय सल्लागार परवेज बेग,जिल्हा उपाध्यक्ष मलीकजान धामणेकर, मो.आसिफ शेख,खैसर मोमीन,मुश्ताक कित्तुर, तौफिक पटेल,मो.वसीम शेख आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment