सावंतवाडी नगर परिषदेच्या सेफ्टीक टॅंक मैला उपसा वाहक व्हॅनचे लोकार्पण
सावंतवाडी: नगर परिषदेच्या सेप्टिक टॅंक मैला उपसा वाहक व्हॅनचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.
सावंतवाडी नगर परिषदेला स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण नामांकन प्राप्त झाले होते. यामध्ये अडीच कोटी रुपयांचे बक्षीस केंद्र सरकारकडून प्राप्त झाले होते.या बक्षिसाच्या रकमेतील 35 लाख 18 हजार रुपयांची ही महिला वाहक व्हॅन आज सावंतवाडी नगर परिषदेच्या ताब्यात दाखल झाली आहे. या नगर परिषदेच्या मैला वाहक व्हँन चे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये फित कापून पार पडले.
यावेळी सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,शुभांगी सुकी सुरेंद्र बांदेकर, प्रतीक बांदेकर तसेच आरोग्य विभागाच्या रसिका नाडकर्णी, पांडुरंग नाटेकर,दीपक म्हापसेकर, प्रिया तेरसे, शिवप्रसाद कुडपकर,वाहनाचे चालक संतोष उर्फ बाळा सावंत, आकाश सावंत, श्री सय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी नामदार दीपक केसरकर यांच्या हस्ते चालक संतोष सावंत यांच्याकडे या व्हॅनची चावी सुपूर्त केली. दर तीन वर्षांनी नागरिकांनी आपल्या शौचालयाच्या मैला टॅंक ची स्वच्छता करावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या सौ. नाडकर्णी यांनी केले आहे.

Comments
Post a Comment