Posts

Showing posts from August, 2022

_आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_

Image
 **🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷हार्दिक शुभेच्छा🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷* _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_   बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...  *॥ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||*                     *🙏🏻शुभेच्छूक🙏🏻*    *श्री.विक्रांत सावंत* ●शिवसेना विधानसभा मतदार संघप्रमुख, सावंतवाडी

_आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_

Image
 *🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷हार्दिक शुभेच्छा🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷* _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_   बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...  *॥ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||*                     *🙏🏻शुभेच्छूक🙏🏻*    *श्री.प्रितेश पांगम* ●युवा उद्योजक कोनाळकट्टा

_आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_

Image
 *🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷हार्दिक शुभेच्छा🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷* _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_   बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...  *॥ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||*                     *🙏🏻शुभेच्छूक🙏🏻*    *श्री.संदेश राणे ●युवासेना तालुका संघटक,दोडामार्ग

_आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_

Image
 *🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷हार्दिक शुभेच्छा🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷* _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_   बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...  *॥ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||*                     *🙏🏻शुभेच्छूक🙏🏻*    *श्री.शैलेश लाड* ●युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते ●राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी,बांदा

_आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_

Image
 *🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷हार्दिक शुभेच्छा🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷* _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_   बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...  *॥ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||*                     *🙏🏻शुभेच्छूक🙏🏻*    *श्री.जावेद खतीब* ●जिल्हा उपाध्यक्ष भाजपयुमो, सिंधुदुर्ग ●ग्रामपंचायत सदस्य बांदा

_आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !

Image
 _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा ! *🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷हार्दिक शुभेच्छा🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷* _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_   बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...  *॥ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||*                     *🙏🏻शुभेच्छूक🙏🏻*    *श्री.ऋषिकेश धर्माधिकारी*  _●पोलीस निरीक्षक दोडामार्ग पोलीस स्थानक दोडामार्ग_

_आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !

Image
 *🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷हार्दिक शुभेच्छा🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷* _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_   बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...  *॥ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||*                     *🙏🏻शुभेच्छूक🙏🏻*    *श्री.मदन राणे* ●युवासेना तालुकाप्रमुख दोडामार्ग

_आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_

Image
 *🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷हार्दिक शुभेच्छा🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷* _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_   बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...  *॥ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||*                     *🙏🏻शुभेच्छूक🙏🏻*    *श्री.बावतीस फर्नांडिस* ●उपाध्यक्ष:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सावंतवाडी तालुका ●माजी सदस्य ग्रामपंचायत चराठा

_आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_

Image
 *🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷हार्दिक शुभेच्छा🪷हार्दिक शुभेच्छा🪷🪷* _आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !_   बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...  *॥ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ||*                     *🙏🏻शुभेच्छूक🙏🏻*    *श्रीचेतन सुभाष चव्हाण ●नगराध्यक्ष नगर पंचायत,दोडामार्ग ●उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !

Image
 आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा !  बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा आपणा सर्वांना सुख , समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो , अशी त्याच्या चरणी प्रार्थना ...                            शुभेच्छूक                  श्री.विवेकानंद नाईक अध्यक्ष:सुशीलबाई चॅरिटेबल ट्रस्ट,दोडामार्ग

मैत्रिणीच्या पतीनेच केला सायलीचा खून;संशयित ताब्यात

Image
वेंगुर्ले : प्रेम संबंध नाकारल्याच्या रागातून मठ-कणेवाडी येथील सायली यशवंत गावडे हिचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या मैत्रिणीच्या पतीला ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघांची सुद्धा चौकशी करण्यात आली. हा प्रकार काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उघड झाला होता. दरम्यान २४ तासांच्याआत आरोपीला गजाआड करणाऱ्या पोलिसांचे कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवती कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. ती रोज सायंकाळी घरी यायची. मात्र दोन दिवसापूर्वी ती कामावरून घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची खबर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली होती. तर तिचा शोध सुरू असतानाच काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका युवकाला तिचा मृतदेह काजू बागेत संशयास्पद रित्या आढळून आला. त्याने याबाबतची खबर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. यावेळी तो मृतदेह बेपत्ता सायलीचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर याबाबतची कल्पना तिच्या नातेवाईकांना देण्...

मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे अपघातात दोघे ठार

Image
 सावंतवाडी : बांदा येथून कणकवलीच्या दिशेने फटाके घेऊन जात असलेल्या झायलो कारला नेमळे येथे अपघात झाला. टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्याच्या पलीकडे पलटी खाल्ल्याने झालेल्या या अपघातात दोघेजण जागीच ठार तर इतर जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी संपर्क साधत बांदा येथील 108 रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेत असताना काही अंतरावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. सुदैवाने आतील रुग्ण चालक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले.दरम्यान जळालेल्या रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा प्रचंड मोठा स्फोट होत असल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची भली मोठी रांग लागली आहे.

न्हावेली येथे श्री देवी माऊली सेवा मंडळाच्या वतीने गणेश सजावट स्पर्धा

Image
  सावंतवाडी: न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्री देवी माऊली युवक कला, क्रीडा,सेवा मंडळाच्यावतीने गणेश चतुर्थी कालावधीत न्हावेली गाव मर्यादित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा-२०२२ चे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे यंदाचे पहिलेच वर्ष आहे . या स्पर्धेत प्रथम क्रमांक १ हजार ५०० रुपये, द्वितीय क्रमांक १ हजार रुपये, तृतीय क्रमांक ७०० रुपये अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत गणेशाची मुर्ती फक्त मातीची असलेल्यांनाच सहभाग घेता येणार आहे. गणपतीची आरास पूर्णतः पर्यावरणपूरक असावी असे बंधनकारक आहे.तर माटवीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य पूर्णतः पर्यावरणपूरक असावे, हालता किंवा स्थिर देखावा पर्यावरण पूरक असावा, सजावटीसाठी धर्माकोलचा वापर केल्यास या स्पर्धेसाठी अपात्र ठरविण्यात येईल. गणपती सजावटीचा फक्त एक फोटो, किती दिवस आपला गणपती असणार आहे, हि माहिती पाठवावी. या स्पर्धेच्या परिक्षणाचे सर्व अधिकार मंडळाकडे राहतील, असे स्पर्धेचे नियम आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.प्रवेशाची अंतिम तारीख शुक्रवार ०२ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ४.०० वाजे पर्यत असणार आहे ९४२०८६४९२९ या व्हाट्स...

सोनूर्ली मंदिरातील चोरीचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे

Image
  सावंतवाडी : दक्षिण कोकणच प्रति पंढरपूर सोनुर्लीच्या श्री देवी माऊली मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माऊली देवीचं दर्शन घेतले. दरम्यान, मंदीरात झालेल्या चोरीबद्दल दीपक केसरकर यांनी ग्रामस्थांकडून माहिती घेतली. पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांना चोरीच्या तपासाबद्दल विचारपूस केली. यावेळी ग्रामस्थांकडून मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे देवीच्या गाभाऱ्यात झालेल्या चोरीचा तपास जलदगतीने व्हावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी दीपक केसरकर म्हणाले, माऊली देवी ही सर्वांच श्रद्धास्थान आहे. या चोरीचा छडा लावत चोरांना कडक शासन केल जाईल‌. तर माऊली मंदिरातील झालेल्या चोरीचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री तथा पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. हा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले करणार असल्याचे त्यांनी सांगितल. यावेळी पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते. यानंतर ग्रामस्थांकडून मंत्री दीपक केसरकर यांच स्वागत करण्यात आले. यावेळी केसरकर म्हणाले, ज्यावेळी चोरीला ...

बांदा सरपंच अक्रम खान यांच्या शिष्टाईने भोगले यांचे उपोषण स्थगित

Image
 बांदा :बांदा शहरातील निमजगा, गवळीटेम्ब, गडगेवाडीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी उपोषण केले. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतर्गत उभारण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत ग्रामस्थ वासुदेव विजय भोगले यांनी केला. ग्रामपंचायत प्रशासनाने या योजनेतील त्रुटीची पूर्तता २० सप्टेंबर पर्यंत करण्याचे लेखी आश्वासन सरपंच अक्रम खान यांनी दिल्याने भोगले यांनी उपोषण दुपारी मागे घेतले. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१४-१५ नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली असून याचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत या योजनेचा तिन्ही वाडीतील लोकांना लाभ घेता नसून यामध्ये अनेक त्रुटी आढळत आहेत. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा भोगले यांचा आरोप आहे. स्थानिक नागरिक या योजनेपासून वंचित असून यासाठी या योजनेतील दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व स्थानिकांना न्याय द्यावा या मागणीसाठी भोगले यांनी सकाळी उपोषण सुरु केले. दुपारी सरपंच अक्रम खान,...

विलवडेत जन्मदात्या आईचा मुलाने केला खून

Image
 सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वरचीवाडी येथे मुलानेच आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दीपक विष्णू दळवी ४२ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार दीपक याने त्याची आई राधाबाई विष्णू दळवी ७० हिच्या डोक्यावर आणि छातीवर हाताने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके यांनी बांदा येथे भेट देत याप्रकरणी माहिती घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे करत आहेत.

साता समुद्रापार झेप घेणाऱ्या वेदीकाचा सर्वानाच अभिमान:सौ.प्रिया नाईक:

Image
  दोडामार्ग :तालुक्यातील कळणे गावात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या वेदिका संतोष देसाई हिची उच्च शिक्षणासाठी अमेरिका विद्यापीठात निवड झाली आहे. ती अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेट मध्ये एनजेआयटी विद्यापीठात मास्टर इन इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग चे शिक्षण घेणार आहे. ही बाब तालुका वासीयांसाठी आभिमानास्पद असून तिच्या या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी ग्रामपंचायत कळणे च्या सरपंच सौ. प्रिया मिलिंद नाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वेदिका देसाई हिच्या कुटुंबियांसह कळणे गाव व दोडामार्ग तालुक्यासाठी ही गर्वाची व अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सरपंचा सौ. प्रिया नाईक म्हणाल्या.  यावेळी सरपंच प्रिया मिलिंद नाईक यांसह ग्रामसेवक नामदेव परब, शिवसेना उप तालुकाप्रमुख मिलिंद नाईक अगंणवाडी सेविका सुचिता साळगांवकर, विद्या गवस, दीपाली सावंत, गौरी कळणेकर, रामा कांबळे, निलेश देसाई, प्रविण देसाई आदी उपस्थित होते.

बांदा येथील भीषण अपघातात एक ठार

Image
 बांदा:मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात हुंडाई ओरा कारमधील एक जण ठार झाला आहे.मनीष कुमावत(२७,रा.इंदोर) असावं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर त्याच्यासोबत असलेली मैत्रीण मेघा कारवा २५ ही जखमी झाली आहे.तर चालक शशांक दुबे २१ सीटबेल्ट लावल्याने सुदैवाने बचावला आहे.हा अपघात एवढा भीषण होता की कार गोव्याच्या दिशेने जात होती ती अपघातानंतर पुन्हा सावंतवाडीच्या दिशेने पलटी होऊन उभी राहिली.गाडी डीवायडर वरून थेट विरुद्ध दिशेने रस्त्यावर पलटी झाली.त्यामुळे पाठीमागे बसलेला मनीष दरवाजातून बाहेर फेकला जात डोक्यावर रस्त्यावर आपटला.दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी मदत करत जखमी मनिषला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.मात्र मेंदूला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

काँग्रेसचे माजी खासदार ब्रि. सुधीर सावंत यांचा शिंदे गटात प्रवेश

Image
 तत्कालीन राजापूर मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी बुधवारी मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये त्यांच्या समवेत प्रवेश केला . यावेळी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे , दोडामार्गचे गणेशप्रसाद गवस , सचिन वालावलकर , शैलेश दळवी उपस्थित होते . काँग्रेस पक्षामधून सुधीर सावंत हे राजापूर मतदारसंघातून १ ९९ १ ला निवडून आले होते . सैन्य दलातून कर्नलपदावरून ते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विनंतीवरून ते राजकारणात आले . त्यानंतर तत्कालीन राजापूर मंतदारसंघासाठी काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केली . जनतेनेही त्यांना खासदार म्हणून निवडून दिले . खासदारकीची टर्म संपल्यानंतर ते पुन्हा सैन्यदलात सक्रिय झाले . यानंतर त्यांना ब्रिगेडियर म्हणून पदोन्नती मिळाली . कारगील युद्धात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली . सेनादलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणाऐवजी शेतकरी व माजी सैनिकांसाठी काम सुरू केले . सैनिक नागरी सहकारी पतसंस्था , आंबोली येथील सैनिक स्क...

...अन्यथा दोडामार्ग स्थानकातून एकही एसटी सुटू देणार नाही:बाबुराव धुरी

Image
 दोडामार्ग:दोडामार्ग तालुक्यातील अती दुर्गम असलेल्या विर्डी गावात वझरे येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे एस टी बस फेरी बंद करण्यात आली होती मात्र आता पुलाचे काम पूर्ण झाले असून आवश्यक ती रस्त्याची डागडुजीही करण्यात आली आहे, मात्र अजूनही एस टी बस फेरी गावात सुरू नसल्याने विर्डी वासीयांचे हाल होत आहेत ही बस फेरी २५ ऑगस्ट पासून सुरू न झाल्यास २६ ऑगस्ट पासून दोडामार्ग लबस स्थानाकावरुन सुटणारी एकही बसफेरी सोडू देणार नसल्याचा इशारा शिवसेना उप जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक  नियंत्रकाना दिला आहे.      या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सदरची बस फेरी सुरू व्हावी यासाठी वाहतूक  नियंत्रक यांना सरपंच व बांधकाम विभाग यांनी पत्र दिले असून त्यात हा रस्ता वाहतुकीस योग्य असल्याचे म्हटले आहे त्यामुळे ही बसफेरी त्वरित सुरू व्हावी असेही त्यानी म्हटले आहे.

सावंतवाडी शहरातून न जाणाऱ्या खाजगी आराम बस चालकांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन

Image
सावंतवाडी: मुंबई,पुणे महानगरातून चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या खाजगी आराम बसेस झाराप पत्रादेवी महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव पुलाच्या ठिकाणी रात्री अपरात्री उतरवत असल्यामुळे महिला वृद्ध लहान मुलांना याचा नाहक त्रास होत आहे.या खाजगी  बसेस सावंतवाडी शहरातून न गेल्यास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गोव्याकडे जाणाऱ्या सर्व प्रवासी बसेस रोखून धरल्या जातील असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आरटीओ तथा राज्य परिवहन विभाग उपविभाग सिंधुदुर्ग यांना दिला आहे. यावेळी सावंतवाडी काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर हेही उपस्थित होते. मुंबई पुणे महामार्गातून अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावाकडे येण्यासाठी निघाले आहेत या गोवा राज्याकडे जाणाऱ्या प्रवासी बसेस सावंतवाडी शहरातून जाणार असे सांगून प्रवासी घेतात.मात्र प्रवाशांना शहरात न आणता त्यांना बायपास चौपदरी महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव पूलावर जबरदस्तीने उतरवले जाते. यासाठी आरटीओ च्या पथकाने पोलिसांच्या मदतीने पहाटे तीन वाजल्यापासून  झाराप झिरो पॉईंट आणि मळगाव पुलावर ...

बांद्यात चोरट्यांचा धुमाकूळ;दोन वनकर्मचाऱ्यांच्या दुचाकी लंपास

Image
 बांदा: शहरातील गवळीटेम्ब येथील भर वस्तीतील ओंकार अपार्टमेंट मधील दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. बांदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओंकार अपार्टमेंट मधील वनरक्षक विष्णू शेशांप्पा नरळे यांच्या मालकीची स्प्लेंडर(एमएच ४५ व्ही ८२३५) किंमत ३० हजार व प्रमोद युवराज जगताप (एमएच ०७ ए ८१८५)इग्नोटर होंडा किंमत ४० हजार  अशा ७० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी रात्री चोरीला गेल्या. बुधवारी सकाळी नरळे यांनी पाहणी केली असता दोन्ही दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची खबर बांदा पोलिसांना दिली.दरम्यान बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले,हवालदार सिताकांत नाईक,बाळकृष्ण गवस,प्रशांत पवार यांनी घटनास्थळी जात पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास संजय हुंबे करीत आहेत. बांदा – वाफोली सीमेवरील गणपती मंदिरातील फंडपेटी चोरीस गेली आहे. मात्र, फंडपेटी चोरी प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान हे चोरटे वाफोली-आंबोली मार्गावरून गेले असल्याचा कयास असून याबाबत तपास सुरू असल्याचे बांदा पोलीस ...

बांदा केंद्र शाळेचा सर्वज्ञ वराडकर राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत द्वितीय

Image
बांदा:भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड आयोजित 12 व्या राज्यस्तरीय ऑनलाइन देशभक्ती पर गीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद  बांदा नं.1केंद्रशाळेत इयत्ता दूसरीत शिकणारा सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला‌ . सर्वज्ञने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले‌ आहे. सर्वज्ञने मिळवलेल्या यशाबद्दल  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर सरपंच अक्रम खान  यांनी अभिनंदन केले . सर्वज्ञला मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर , सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर ,शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे,जागृती धुरी, शितल गवस रंगनाथ परब, जे.डी.पाटील, प्रशांत ‌पवार,गोपाळ साबळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले. सर्वज्ञने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

Image
सावंतवाडी - सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले. यापैकी राहुल राऊत व अद्वय देशपांडे यांनी नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवले. चिराग चितारी याने इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. पार्थ पाटील याने इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये झोनल सिल्वर मेडल व रुपये एक हजारचे पारितोषिक प्राप्त केले. आदित्य जगताप याने नॅशनल सायबर ऑलिंपियाडमध्ये झोनल मेडल व रुपये पाचशे पारितोषिक प्राप्त केले. मानस पाटकर याने इंटरनॅशनल सोशल सायन्स ऑलिंपियाडमध्ये मेडल ऑफ डिस्टिंक्शन प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले  व प्राचार्य व्यंकटेश बक्षी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे व्ही.एन.नाबर मधील विद्यार्थ्यांना पुस्तके

Image
 *रोटरी क्लब आँफ बांदा कडून एम.एस.एफ.सी. विषयाची पुस्तके व्ही.एन.नाबर इग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना भेट* बांदा :         बांदा रोटरी क्लब, नेहमीच बांदा दशक्रोशीत सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवत आहेत. यामध्ये शैक्षणिक उपक्रमातून त्यांनी येथील व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना एम.एस.एफ.सी. विषयातील ऊर्जा व पर्यावरण विभागाची पुस्तके मोफत भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला. या शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून रोटरी क्लब आँफ बांदा यांनी हा उपक्रम  व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये  नुकतान घेण्यात आला.           यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, रो.बाबा काणेकर रो. संदीप देसाई, रो. योगेश परुळेकर, रो.सुधीर शिरसाट प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, उपस्थित होते.          व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये एम.एस.एफ.सी.सारख्या स्तुत्य उपक्रमातून तंत्र शिक्षण येथील विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळ...

कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी दिवंगत सहकारी प्रकाश परब यांना अर्पण केली श्रद्धांजली

Image
  तळवडे : कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे सहकारी प्रकाश परब यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली . त्यांच्या राजकीय घडामोडीत तसेच राजकीय जडणघडणीत प्रकाश परब यांचे मोलाचे योगदान होते . महाराष्ट्रामध्ये जी पूर्वी चांदा ते बांदा योजना सुरू झाली होती ती पुन्हा त्याच नावाने सुरू करण्यात येणार आहे . चांदा ते बांदा योजना सुरू करण्यामागे प्रकाश परब यांचे मोलाचे योगदान आहे . त्यांनी योजना सुरू होण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट केले होते . त्यामुळे ही योजना पुन्हा चांदा ते बांदा नावाने सुरू झाली तर त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली वाहिली असे होईल , असे मंत्री केसरकर म्हणाले . त्याचप्रमाणे चांदा ते बांदा योजना पूर्ण राज्याच्या सर्वांना विकासासाठी मोलाचे योगदान ठरणार आहे .  या योजनेतून गोरगरीब शेतकरी असो किंवा सर्वसामान्य बेरोजगार युवक असो त्यांना लाभ होणार आहे . या योजनेमार्फत विविध प्रकारच्या योजना उपक्रम राबवण्यात यासाठी फायदा होणार आहे . त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून ही योजना चां...

आ.वैभव नाईक यांचे मानले व्यायाम पटूंनी आभार

Image
  मालवण: शहरात अत्याधुनिक व्यायामशाळा व्हावी, तसेच याठिकाणी अद्यावत मशिनरी, साहित्य मिळावे यासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्याकडे केल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्यातून आमदार वैभव नाईक यांनी व्यायाम साहित्य व मशीनरी उपलब्ध करून दिल्या बद्दल जिम मधील सदस्यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत. मालवण नगरपरिषदेच्या इमारतीतील व्यायामशाळेत अत्याधुनिक व्यायाम साहित्य मिळावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. आवश्यक साहित्य, मशीनरी नसल्याने व्यायाम करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील व्यायामशाळेसाठी आवश्यक साहित्य मिळावे, अशी मागणी व्यायामपट्टूमधून करण्यात येत होती. अखेर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. आमदार नाईक यांनीही तात्काळ २५ लाखाचा निधी देण्याचा शब्द दिला. याची पूर्तता झाली असून सर्व आवश्यक साहित्य, मशीनरी व्यायाम शाळेत उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत तसेच माजी बांधकाम सभापती मंद...

शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या 'स्वराज्य महिला' दहीहंडी उत्सव सोहळा थाटात

Image
 मालवण,ता.२२: शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्यावतीने आयोजित स्वराज्य महिला दहीहंडी उत्सव सोहळा यतीन खोत यांच्या निवासस्थान परिसरात मोठ्या उत्साहात झाला. महिला वर्गाच्या आग्रही मागणीनुसार शिल्पा खोत यांनी पुढाकार घेऊन पहिल्यांदाच आयोजित केलेल्या महिला दहीहंडी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी शिल्पा खोत यांच्यासह चारुशीला आढाव, प्रतिभा चव्हाण, अश्विनी आचरेकर, साक्षी मयेकर, शांती तोंडवळकर, चित्रा सांडव, स्वाती तांडेल, पूजा तळाशिलकर, रूपा कांदळकर, दीपा पवार, कृपा कोरगावकर, अनुष्का कांबळी, सायली कांबळी, निकिता तोडणकर, दिया पवार, श्रुती धुरी, विद्या चव्हाण, व इतर महिला यावेळी सहभागी झाल्या होत्या. लायन्स क्लब अध्यक्ष वैशाली शंकरदास व पदाधिकारी तसेच चाची हडकर यांच्याकडून १० हजार १११ रुपयांचे पारितोषिक तीन थर लावून दहीदांडी फोडणाऱ्या महिला भगिनींना देण्यात आले. यावेळी बाल चमुनीही धमाल मजा मस्ती केली. कृष्णच्या वेशभूषेत साहिल नितीन तोडणकर व अन्य बच्चे कंपनी उपस्थित होती.

मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत आयोजित शालेय स्पर्धांचा शुभारंभ

Image
 सावंतवाडी:ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून आयोजित शालेय स्पर्धांचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त गावागावात,शहराशहरात ठीक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. याच धर्तीवर ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून 7 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मळेवाड कोंडूरे  गावातील शालेय मुलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 च्या सभागृहात करण्यात आले होते. या शालेय स्पर्धाचा शुभारंभ ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आला.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश राऊत,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,स्नेहल नाईक,महेश शिरसाट, मधुकर जाधव,कविता शेगडे,  तात्या मुळीक,सानिका शेवडे,ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर पोलीस पाटील दिगंबर मसुरकरआदी ग्रामस्थव शिक्षक विद्यार्थीपालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.    या शुभारंभ प्र...

कळणेच्या 'वेदीका'ची साता समुद्रापार भरारी

Image
  दोडामार्ग :महत्वकांक्षेला कष्ट व जिद्दीची जोड दिल्यास जगात अशक्यप्राय अशी कोणतीही गोष्ट नाही. हीच बाब कळणे (ता. दोडामार्ग) येथील वेदिका संतोष देसाई या युवतीने सिद्ध करुन दाखविली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील या युवतीची अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेटमध्ये एनजेआयटी विद्यापीठात मास्टर इन इंडस्ट्रिअल इंजिनिअरींग अभ्यासक्रमासाठी झालेली निवड निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. तिच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल बोलताना वेदिका म्हणाली, मी एका ग्रामीण सामान्य शेतकरी कुटुंबातील. आर्थिक परिस्थिती तशी जेमतेम. मात्र आईवडिलांची इच्छा होती की मी इंग्लिश मिडियमधून शिकावे. आजूबाजूला इंग्लिश माध्यमाच्या शाळा नव्हत्या. त्यामुळे भेडशी येथील करुणा सदन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. घरापासून शाळा सुमारे २५ किमी दूर होती. वडील दररोज शाळेत नेऊन सोडायचे व पुन्हा न्यायला येत असत. वडिलांचे दोडामार्ग बाजारपेठेत छोटेसे घडाळ्याचे दुकान आहे. माझ्या शिक्षणासाठी माझ्यापेक्षा वडिलांनी घेतलेली मेहनत खूप मोठी होती. दहावीत ९३ टक्के गुण मिळवून मी उत्तीर्ण झाले. त्यानंतर सायन...

शेवटच्या श्रावणी सोमवारी श्री देव पाटेकर चरणी भक्तगण लीन...

Image
  सावंतवाडी : श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी, सावंतवाडीचं श्रद्धास्थान राजघराण्याच दैवत श्री देव पाटेकर चरणी लीन होण्यासाठी जिल्ह्यासह गोव्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण सावंतवाडीत दाखल झाले होते. सकाळी युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते श्री देव पाटेश्वराच पूजन, अभिषेक करण्यात आला. सावंतवाडीचे श्रद्धास्थान आराध्यदैवत, संस्थानकालीन श्री देव पाटेकर देवस्थान शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त भक्तांच्या गर्दीन फुलून गेलं होतं. सकाळी राजघराण्याचे युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली.यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोंसले उपस्थित होत्या. पुजेनंतर श्री देव पाटेकर दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. सावंतवाडीसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोव्याहून आलेल्या भक्तांनी श्री देव पाटेकराच दर्शन घेतले. शिवनामजपात शिवभक्त तल्लीन झाले होते.

दोडामार्ग शहराच्या विकासासाठी आवश्यक सर्व निधी देणार:दीपक केसरकर

Image
  दोडामार्ग: दोडामार्ग शहराच्या विकासासाठी आवश्यक तो सर्व निधी देण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आगळेवेगळे शहर म्हणून दोडामार्ग शहर पुढे येण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल , अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी येथे दिली . नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी उभारलेल्या श्री साईबाबा मंदिरात पुन : प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी केसरकर हे खास दोडामार्गात आले होते . त्यावेळी ते बोलत होते .  येथील बसस्थानकासमोरील या साई मंदिरात चेतन चव्हाण यांनी साईबाबा मूर्तीची पुन : प्रतिष्ठापनातसेच होमहवन , पूजाअर्चा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते . त्यांच्या निमंत्रणाच्या अनुषंगाने मंत्री केसरकर रविवारी दुपारी दोडामार्गात दाखल झाले . यावेळी चव्हाण व त्यांचे नगरसेवक , मित्रमंडळ परिवार कुटुंबीय आदींनी केसरकर यांचे स्वागत केले . यावेळी शिवसेनेचे दोडामार्ग शहरप्रमुख लवू मिरकर , योगेश महाले , बांधकाम सभापती नितीन मणेरीकर , समीर रेडकर , सुनील गवस आदीनी केसरकर यांचे- स्वागत केले . तसेच जि . प . च्या माजी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ . अनिशा दळवी यांनीही केसरकर यांचे पुष्पगुच्छ...

आडाळी एमआयडीसी अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प,उद्योग व्यवसाय माध्यमातून लवकरच सुरू होईल:केसरकर

Image
  दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील एमआयडीसी अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प , उद्योग व्यवसाय तसेच विविध कंपन्या आदींच्या माध्यमातून ही एमआयडीसी लवकरात लवकर सुरू होईल . यासाठी राज्यस्तरावरून आवश्यक ती सर्व कार्यवाही सुरू आहे , असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी झोळंबे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले . यावेळी नायब तहसीलदार एन . एन . देसाई , गटविकास अधिकारी व्ही . एम . नाईक , पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी , केंद्रप्रमुख गुरुदास कुबल , ग्रामसेवक सोमनाथ वाघमोडे , माजी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस , पं . स . चे माजी सदस्य बाळा नाईक , तालुका संघटक गोपाळ गवस , उपतालुकाप्रमुख दादा देसाई , सरपंच सेवासंघ तालुकाध्यक्ष प्रवीण परब , जि . प . चे माजी बांधकाम सभापती तुकाराम बर्डे , जि . प . च्या माजी सदस्या संपदा देसाई , भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस , तळकट सरपंच महादेव देसाई , मणेरी सरपंच विशांत तळवडेकर , रामदास मेस्त्री , राजू निंबाळकर , योगेश महाले ,भगवान गवस , संतोष शेटये , हर्षद सावंत , उपसरपंच पांडुरंग ग...

तुम्ही दिलेल्या प्रेमाचा उतराई होऊ शकत नाही:ना.दीपक केसरकर

Image
सावंतवाडी: समाजाने केलेले कौतुक हे घरचे कौतुक असते भंडारी समाजाचा जाज्वल्य इतिहास आहे.प्रत्येकाने त्याची प्रेरणा त्याची घेतली पाहिजे याच हेतूने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या नावाने सावंतवाडीत जिमखाना मैदानावर  पॅव्हेलियन उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. ते सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा आज  सावंतवाडीत पार पडला यावेळी ते बोलत होते.  यावेळी लखमराजे सावंत भोसले,नवीनचंद्र बांदिवडेकर,पोलीस निरीक्षक शंकर कोरे,अध्यक्ष जगदीश मांजरेकर,गुरूनाथ पेडणेकर,नितीन मांजरेकर,देवीदास आडारकर बबन राणे आदि  उपस्थित होते. केसरकर म्हणाले,कुडाळ येथे भंडारी समाजासाठी सुसज्ज हाॅस्टेल ची घोषणा मागच्या वेळी मंत्री असताना केली होती.ती आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. भंडारी समाजाचे कार्य मोठे आहे. मी मंत्री होण्यासाठी भंडारी समाज्याचे योगदान मोठे आहे मी यातून उतराई कधीही होऊ शकणार नाही.त्यामुळेच या समाजासाठी जेवढे काही करेन तेवढे कमी आहे.सावंतवाडीत मराठा समाजासाठीचे वस्तीगृह शिवराम राजेच्या...

सावंतवाडीच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली ना.चव्हाण यांची भेट

Image
 सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती अँड.परिमल नाईक, माजी पाणीपुरवठा सभापती उदय नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री  रविंद्र चव्हाण यांनी विकासकाम, निवडणूका, संघटनात्मक बांधणीसह विविध विषयांवर चर्चा केली. तर पदाधिकाऱ्यांकडून देखील  मांडण्यात आलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचा शब्द मंत्री चव्हाण यांनी दिला.  यावेळी मंत्री चव्हाण यांनी तालुक्यासह सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने भाजप नेते महेश सारंग, माजी नगरसेवक अँड. परिमल नाईक, सुधिर सुधिर आडिवरेकर, उदय नाईक यांच्याशी चर्चा केली. शहरातील प्रकल्पांसह रखडलेल्या विकासकांमांबाबत माजी नगरसेवकांकडून माहिती घेतली. पदाधिकाऱ्यांकडून केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकांत भाजपला स्वबळावर लढायच आहे. शतप्रतिशत भाजपसाठी सगळ्या निवडणूका...

एनएचएम् कर्मचाऱ्यांच्या समस्यां लवकरच निकाली :शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Image
  सावंतवाडी :एनएचएम आरोग्य राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली जाईल . आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी काही आरक्षित जागा देऊन टप्प्याटप्प्याने सरळ सेवेत घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल . तसे प्रयत्न करण्यात येतील , असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एनएचएमच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले . केसरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते . त्यावेळी केसरकर यांची भेट घेऊन संघटना अध्यक्ष हेमदीप पाताडे , सचिव सुवर्णा रावराणे , अजित सावंत , उत्कर्षा गोवेकर , कार्मीस अलमेडा यांनी त्यांना निवेदन दिले . यावेळी नितीन मांजरेकर यांनी केसरकर यांची भेट घडवून आणली . यावेळी जिल्ह्यातील २५० कर्मचारी उपस्थित होते . त्यांनी निवेदनात म्हटले आहे की , आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत विशेष बैठक घेऊन सकारात्मक न्याय मिळावा . आम्ही २००७ पासून जिल्ह्यात ५५६ तर राज्यात २६००० अधिकारी व कर्मचारी विविध पदांवर ...

बांदा पोलिसांच्या कारवाईत ४ लाख ६० हजारांची दारू जप्त

Image
 बांदा:अशोक लेलंड टेम्पोमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध दारू वाहतूक करताना बांदा पोलिसांच्या तपासणी लाठीवर कारवाई करत ४ लाख ६० हजार ८०० रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे,उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रथमेश पवार आणि संजय हुंबे यांनी केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की,गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर गोव्यातून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टेंपोला (एमएच ३९ एडी १७०२) हा तपासणीसाठी थांबवण्यात आला.दरम्यान या टेंपोच्या हौद्याची तपासणी केली असता इंप्रियल ब्ल्यू व्हिस्कीचे ५० बॉक्स (किंमत ४ लाख ६० हजार ८००) आढळून आले.ही दारू नाशिक येथे नेण्यात येत होती.याप्रकरणी विशाल रघुनाथ तुपे(सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

मणेरी येथे उस्मानाबाद-पणजी बसला अपघात

Image
 दोडामार्ग:बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर दोडामार्गच्या दिशेने जाणारी उस्मानाबाद-पणजी ही एशियाड बस रस्त्याच्या बाहेर जाऊन एका बाजूला कलंडली.सुदैवाने ही बस पलटी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.समोरून येणाऱ्या वाहनाला बाजु देताना हा अपघात घडला.यातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

मराठा आरक्षण आणि छत्रपतींचे स्मारक साकार होणे हीच स्व.विनायक मेटे यांना श्रद्धांजली ठरेल

Image
 सावंतवाडी :मराठा समाजाला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक असावे म्हणून मा आमदार विनायकराव मेटे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पुढाकार घेतला, ते प्रत्यक्षात साकार होईल तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असा विश्वास सावंतवाडी मराठा समाजाने आयोजित केलेल्या श्रध्दांजली सभेत व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाचे नेते मा आमदार विनायकराव मेटे यांना सावंतवाडी मराठा समाजाने श्रध्दांजली वाहिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विकास सावंत, अँड सुहास सावंत, अच्युत सावंत भोसले,सौ अर्चना घारे परब, अध्यक्ष सिताराम गावडे, लक्ष्मण नाईक, राघोजी सावंत, अशोक दळवी, नारायण राणे, अँड शामराव सावंत, पुंडलिक दळवी, प्रेमानंद देसाई, मंगलदास देसाई, अँड निता कविटकर,भाई देऊलकर, भारती मोरे,दिपाली सावंत,नाना धोंड, प्रसाद दळवी,धोंडी दळवी, एकनाथ जाधव,सुरज लाड, प्रशांत बिरोडकर, संदिप गावडे, सचिन बिरोडकर,शुभम घावरे,सागर गावडे,जयवंत घोगळे दिव्येश बिरोडकर,अँड संतोष सावंत, दर्शना बाबर देसाई, विश्वास घाग, चंद्रकांत राणे, आकाश मिसाळ, प्रमोद गावडे,आर के सावंत,अमरनाथ सावंत, विनोद सावंत, दिपाली सावंत, स...

सावंतवाडीत दहीहंडीचा थरार : पाच थरांची सलामी

Image
सावंतवाडी :  गोविंदा रे गोपाळाच्या, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा" च्या जयघोषात डीजे च्या तालावर  सावंतवाडीत दहीहंडी उत्सव साजरा झाला. तब्बल दोन वर्षांच्या ब्रेकनंतर गोविंदा मैदानात उतरला. सावंतवाडीतील अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाच्या माध्यमातून चार थरांची दहिहंडी फोडत दहीहंडी उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. हा सोहळा व दहीहंड्यांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.       दहीहंडी उत्सवाच्या सुरुवातीला सालईवाडा येथील  संस्थानकालीन मुरलीधर मंदीर इथं धार्मिक कार्यक्रमासह आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमेय तेंडोलकर यांच्या वडीलांच नुकतच निधन झाल्यानं त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मानाची दहिहंडी फोडण्यात आली. यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेत असताना चौकाचौकातील दहिहंड्या फोडण्यात आल्या. यावेळी मोठ्या जल्लोषात हे गोविंदा पहायला मिळाले.      यावेळी माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकुर, देव्या सुर्याजी, ॲड. अतु्ल केसरकर, अर्चित पोकळे, सनी जाधव, मयूर लाखे...

बांद्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं संजू परब यांचं अभिष्टचिंतन

Image
 सावंतवाडी:भाजपचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस आज सावंतवाडीत मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी बांदा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केलं.तसेच पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,माजी सभापती प्रमोद कामत,प्रशांत कामत,भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब,बांदा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत,गुरुनाथ सावंत,ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, अविनाश पंडित,डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई,विणेश गवस,मधुकर देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझे वय आशिर्वाद देण्याचे,संजू परब यांच्या पाठीशी नेहमीच आशिर्वाद:दीपक केसरकर

Image
  सावंतवाडी :ठाकरे गटाचा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले तर विधानभवनाच्या पायऱ्यावरच्या घोषणा आणखी वाढतील अशी कोपरखळी विरोधकांना मारत लवकरच या घोषणांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला ते   बोलत होते यावेळी त्यांनी केंद्राचे शैक्षणिक धोरण राज्यातही लागू करणार असल्याचेही स्पष्ट केले.सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले,विद्याधर परब बंटी पुरोहित,दिलीप भालेकर,सत्यवान बांदेकर आदि उपस्थित होते. केसरकर म्हणाले, राज्यात अडीच वर्षांपूर्वी मागच्या दरवाजाने महाविकास आघाडी सरकार आले. त्यामुळे ते जास्त दिवस टिकले नाही आता खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा सरकार आलेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासाचा रथ सर्वांना मिळून पुढे घेऊन जायचं आहे. माझ्याकडे असलेले शालेय शिक्षण खाते हे राज्यातील प्रमुख खाते आहे.त्यामुळे मला जास्ती जास्त काम करावे लागते त्यातून स्थानिकांशी सर्पक ही कमी प्रमा...

भाजप प्रवक्ते संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Image
  भाजपचे जिल्हा प्रवक्ते,माजी नगराध्यक्ष             श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐               💐 शुभेच्छूक💐              श्री.जावेद खतीब ●भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ●ग्रामपंचायत सदस्य,बांदा ग्रामपंचायत

आजगाव केंद्रशाळा नं.१ मधील आयोजित वेशभूषा स्पर्धेत चिन्मय कोटणीस,सौम्या गोवेकर प्रथम

Image
सावंतवाडी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजगाव केंद्रशाळा नं. १ येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेत लहान गटात चिन्मय कोटणीस तर मोठ्या गटात सौम्या गोवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघाच्यावातीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये देशभक्ती, देशप्रेम याबद्दल प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या देशभक्त, क्रांतीकारकाची वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एकापेक्षा एक अशी सरस कामगिरी मुलांनी केली. या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे – पाचवी ते सातवी गट प्रथम- चिन्मय विक्रम कोटणीस, द्वितीय- कनक दीनानाथ काळोजी, तृतीय – नील नितीन बांदेकर, तर उत्तेजनार्थ – नैतिक निलेश मोरजकर, शमिका राजन आरावंदेकर. इयत्ता आठवी ते दहावी गट, प्रथम – सौम्या यशवंत गोवेकर, द्वितीय – श्रावणी राजन आरावंदेकर , तृतीय – संघवी मोहन जाधव तर उत्तेजनार्थ पारितोषिक दीक्षा प्रदीप काकतकर, पारद शंकर पेडण...

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्यासंदर्भात आ.राणेंची सहकार मंत्र्याशी भेट

Image
 सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेले खावटी कर्ज माफ करण्यासंदर्भात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.  राज्यात भाजपा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची सत्ता आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भाजपचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह राज्याचे सहकार मंत्री यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खावटी कर्ज माफ करण्यासंदर्भात यावेळी लक्ष वेधण्यात आले. खावटी कर्ज माफ करण्याकरिता सुमारे 24 कोटी रुपयांची गरज असून हा निधी देण्यासंदर्भात या भेटीदरम्यान मागणी करण्यात आली. त्यावर श्री सावे यांनी या संदर्भात संबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी यांच्याशी एकत्रित बैठक घेत निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याची म...

भाजप प्रवक्ते,माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा

Image
  सावंतवाडी : भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस उद्या तारीख १९ ला होत आहे. या निमित्ताने सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष अजय गोंदावले व माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी केले आहे. दरम्यान या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णालयात फळ वाटप तसेच रक्तदान शिबिर व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे श्री. गोंदावले यांनी केले आहे.

जनतेचा आशीर्वाद आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यामुळेच हे शिवधनुष्य पेलू शकलो:पुंडलीक दळवी

Image
  सावंतवाडी : माझ्या आयुष्याची सुरुवात संघर्षातून झाली आहे. तशी सवय असल्यामुळेच मी जीवनात यशस्वी झालो. राष्ट्रवादीत प्रवेश करताना सुद्धा केवळ चार-पाच कार्यकर्तेच माझ्यासोबत होते. मात्र पक्षाची जबाबदारी मी यशस्वी हाताळली. त्यामुळेच आज मला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली, असा विश्वास राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान माझा पिंड मुळात समाजकारणाचा होता. मात्र नकळत मी राजकारणात आलो. तरीसुद्धा माझे समाजकार्य मी प्रभावीपणे सुरू ठेवले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. दळवी यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दळवी यांच्या पत्नी सौ. पूजा दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, उद्योग-व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, तालुका स...

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी स्वच्छता मित्रांसोबत केला वाढदिवस साजरा

Image
  सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा उद्योग व व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सावंतवाडीच्या सफाईसाठी, शहर स्वच्छ व‌ सुंदर ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या सफाई मित्रांना जीवनोपयोगी वस्तू पुंडलिक दळवी यांच्या माध्यमातून देत अनोखा उपक्रम राबविला. यानंतर सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वच्छता मित्रांसोबत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सफाई मित्रांना दिलेल्या शुभेच्छांनी पुंडलिक दळवी भारावून गेले. सफाई मित्रांकडून पुंडलिक दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले.   पुंडलिक दळवी यांनी वाढदिनी अनोखा उपक्रम राबविला असून सावंतवाडी शहर सुंदर ठेवण्यासाठी सण, वेळ कळ विसरून तुटपुंज्या पगारात काम करून, एवढे कष्ट करून नेहमी हसतमुख असणाऱ्या सफाई मित्रांचा दिवस गोड करण्यासाठी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले. ज्या...