मैत्रिणीच्या पतीनेच केला सायलीचा खून;संशयित ताब्यात

वेंगुर्ले: प्रेम संबंध नाकारल्याच्या रागातून मठ-कणेवाडी येथील सायली यशवंत गावडे हिचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या मैत्रिणीच्या पतीला ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघांची सुद्धा चौकशी करण्यात आली. हा प्रकार काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उघड झाला होता. दरम्यान २४ तासांच्याआत आरोपीला गजाआड करणाऱ्या पोलिसांचे कौतुक होत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवती कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. ती रोज सायंकाळी घरी यायची. मात्र दोन दिवसापूर्वी ती कामावरून घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची खबर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली होती. तर तिचा शोध सुरू असतानाच काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका युवकाला तिचा मृतदेह काजू बागेत संशयास्पद रित्या आढळून आला. त्याने याबाबतची खबर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. यावेळी तो मृतदेह बेपत्ता सायलीचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर याबाबतची कल्पना तिच्या नातेवाईकांना देण्यात आली. दरम्यान मृतदेहावर संशयास्पद खुणा आणि जखमा आढळून आल्या होत्या. त्यावरून तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला होता. त्या दृष्टीने तपास सुरू असताना संशयित म्हणून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात एक तिच्या मैत्रिणीचा पती होता. त्याने प्रेम संबंधाला नकार दिल्याच्या रागातून हा प्रकार केला, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, ओरोस येथील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घाग यासह पुन्हा अन्वेषण शाखेची टीम करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे