विलवडेत जन्मदात्या आईचा मुलाने केला खून

 सावंतवाडी तालुक्यातील विलवडे वरचीवाडी येथे मुलानेच आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दीपक विष्णू दळवी ४२ याच्यावर गुन्हा दाखल


झाला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार दीपक याने त्याची आई राधाबाई विष्णू दळवी ७० हिच्या डोक्यावर आणि छातीवर हाताने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके यांनी बांदा येथे भेट देत याप्रकरणी माहिती घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे