सावंतवाडी शहरातून न जाणाऱ्या खाजगी आराम बस चालकांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन
सावंतवाडी: मुंबई,पुणे महानगरातून चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या खाजगी आराम बसेस झाराप पत्रादेवी महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव पुलाच्या ठिकाणी रात्री अपरात्री उतरवत असल्यामुळे महिला वृद्ध लहान मुलांना याचा नाहक त्रास होत आहे.या खाजगी बसेस सावंतवाडी शहरातून न गेल्यास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गोव्याकडे जाणाऱ्या सर्व प्रवासी
बसेस रोखून धरल्या जातील असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आरटीओ तथा राज्य परिवहन विभाग उपविभाग सिंधुदुर्ग यांना दिला आहे. यावेळी सावंतवाडी काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर हेही उपस्थित होते.
मुंबई पुणे महामार्गातून अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावाकडे येण्यासाठी निघाले आहेत या गोवा राज्याकडे जाणाऱ्या प्रवासी बसेस सावंतवाडी शहरातून जाणार असे सांगून प्रवासी घेतात.मात्र प्रवाशांना शहरात न आणता त्यांना बायपास चौपदरी महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव पूलावर जबरदस्तीने उतरवले जाते. यासाठी आरटीओ च्या पथकाने पोलिसांच्या मदतीने पहाटे तीन वाजल्यापासून झाराप झिरो पॉईंट आणि मळगाव पुलावर गस्तीपथक नेमावे त्या ठिकाणी उतरवण्यात येणाऱ्या प्रवाशाला बस सावंतवाडी बस स्थानकामध्ये जाणार असल्याचे सांगितले आहे काय हे विचारावे आणि त्यानंतरच बस गोव्याकडे सोडावी अन्यथा या बस चालकाला ही बस सावंतवाडी मार्गे गोव्याकडे देण्यास सांगावे तसे न करणाऱ्या बस चालकाविरुद्ध आणि मालकाविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे
या आराम, निम आराम खाजगी जादा बसेस असल्यामुळे या बसेस मुंबई किंवा पुणे येथून रात्री सुटतात आणि पहाटे किंवा मध्यरात्री गावी दाखल होतात सावंतवाडी एसटी बस स्थानक पर्यंत जाणार अशा प्रकारचे प्रवाशांना सांगून बसेस मधून प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देतात मात्र प्रत्यक्षात सावंतवाडीला न आणता बस महामार्गावरून गोव्याकडे रवाना केली जाते त्यामुळे या प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड बसतोच शिवाय रात्रच्या गैरसोयीच्या वेळेस रस्त्यावर सामान उतरवून चोरीची शक्यता नाकारता येत नाही शिवाय पहाटेची वेळ असल्यामुळे वाहनांची उपलब्धता रिक्षाची वाट पहावी लागते त्यामुळे या प्रवासी महिला,आबालवृद्ध प्रवाशांचे हाल होतात यासाठी ज्या खाजगी आराम आणि किंवा निम आराम प्रवासी बसेस सावंतवाडी बस स्टॅन्ड येथून जाणार नाहीत अशा बसेस सह सर्वच प्रवासी वाहतूक रोखून धरण्यात येईल त्यानंतर होणाऱ्या परिणामास राज्याचे परिवहन विभाग जबाबदार असेल असा इशारा सांगेलकर यांनी दिला आहे

Comments
Post a Comment