आडाळी एमआयडीसी अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प,उद्योग व्यवसाय माध्यमातून लवकरच सुरू होईल:केसरकर
दोडामार्ग:दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील एमआयडीसी अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प , उद्योग व्यवसाय तसेच विविध कंपन्या आदींच्या माध्यमातून ही एमआयडीसी लवकरात लवकर सुरू होईल . यासाठी राज्यस्तरावरून आवश्यक ती सर्व कार्यवाही सुरू आहे , असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक
केसरकर यांनी झोळंबे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले . यावेळी नायब तहसीलदार एन . एन . देसाई , गटविकास अधिकारी व्ही . एम . नाईक , पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी , केंद्रप्रमुख गुरुदास कुबल , ग्रामसेवक सोमनाथ वाघमोडे , माजी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस , पं . स . चे माजी सदस्य बाळा नाईक , तालुका संघटक गोपाळ गवस , उपतालुकाप्रमुख दादा देसाई , सरपंच सेवासंघ तालुकाध्यक्ष प्रवीण परब , जि . प . चे माजी बांधकाम सभापती तुकाराम बर्डे , जि . प . च्या माजी सदस्या संपदा देसाई , भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस , तळकट सरपंच महादेव देसाई , मणेरी सरपंच विशांत तळवडेकर , रामदास मेस्त्री , राजू निंबाळकर , योगेश महाले ,भगवान गवस , संतोष शेटये , हर्षद सावंत , उपसरपंच पांडुरंग गवस , ग्रा . पं . सदस्य पूजा गवस , मानसी गवस , मंगेश नाटेकर , वैशाली नाईक , शिवाजी गवस , पार्वती वेटे व झोळंबे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . केसरकर पुढे म्हणाले की , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोकणावर विशेषतः सिंधुदुर्गवर विशेष प्रेम असून सिंधुदुर्गच्या विकासासाठी निधी कमी न पडू देण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केला आहे . दोडामार्ग तालुक्यातील एमआयडीसी असो अथवा जिल्ह्यातील कोणतेही अन्य विकासात्मक प्रकल्प असो सिंधुदुर्गात विकास प्रक्रिया सतत चालू राहवी , यासाठी आपण विशेष कार्यरत राहणार आहोत , असे केसरकर म्हणाले . प्रास्ताविक झोळंबे सरपंच राजेश गवस यांनी तर आभार ग्रामसेवक सोमनाथ वाघमोडे यांनी मानले . तसेच यावेळी अनेक महिला बचत गटाच्या महिला व अनेक ज्येष्ठ व्यक्तींचा केसरकर यांच्या हस्ते शाल , श्रीफळ देऊनसत्कार करण्यात आला . तसेच मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल केसरकर यांचाही झोळंबे ग्रामस्थांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला . मंत्रिपदाचा सर्वसामान्यांसाठी उपयोग करणार ! मिळालेल्या मंत्रिपदाचा मला मी कोकणच्या व विशेषतः सिंधदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करणार आहे . चांदा ते बांदा या पुनरुजीवीत झालेल्या योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गाव विकासप्रक्रियेत आणण्याचे महत्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे . त्याचा रिझल्ट लवकरच पहायला मिळेल . यावेळी केसरकर यांनी झोळंबे गावातील अनेक विकासकामांकरिता तात्काळ निधी जाहीर केला . तर प्रसंगी ‘ असिस्टंट ' होईन ! माझ्या मतदारसंघासोबत जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास कसा होईल , त्याकडे आपले लक्ष राहणार आहे . जरी मी मंत्री असलो तरी गरज भासल्यास नागरिकांच्या विकासकामांकरिता मी माझ्या पेक्षा अन्य वरिष्ठ मंत्र्यांचा असिस्टंट म्हणून काम करेन . पण , विकास प्रक्रिया थांबू देणार नाही , असे यावेळी केसरकर म्हणाले .

Comments
Post a Comment