न्हावेली येथे श्री देवी माऊली सेवा मंडळाच्या वतीने गणेश सजावट स्पर्धा

 सावंतवाडी:न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्री देवी माऊली युवक कला, क्रीडा,सेवा मंडळाच्यावतीने गणेश चतुर्थी कालावधीत न्हावेली गाव मर्यादित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा-२०२२ चे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे यंदाचे पहिलेच वर्ष आहे .


या स्पर्धेत प्रथम क्रमांक १ हजार ५०० रुपये, द्वितीय क्रमांक १ हजार रुपये, तृतीय क्रमांक ७०० रुपये अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेत गणेशाची मुर्ती फक्त मातीची असलेल्यांनाच सहभाग घेता येणार आहे. गणपतीची आरास पूर्णतः पर्यावरणपूरक असावी असे बंधनकारक आहे.तर माटवीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य पूर्णतः पर्यावरणपूरक असावे, हालता किंवा स्थिर देखावा पर्यावरण पूरक असावा, सजावटीसाठी धर्माकोलचा वापर केल्यास या स्पर्धेसाठी अपात्र ठरविण्यात येईल. गणपती सजावटीचा फक्त एक फोटो, किती दिवस आपला गणपती असणार आहे, हि माहिती पाठवावी. या स्पर्धेच्या परिक्षणाचे सर्व अधिकार मंडळाकडे राहतील, असे स्पर्धेचे नियम आहेत.

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.प्रवेशाची अंतिम तारीख शुक्रवार ०२ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ४.०० वाजे पर्यत असणार आहे

९४२०८६४९२९ या व्हाट्सअप नंबरवर आपले नाव, वाडी, मोबाईल नंबर पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी ९४२११९०६७८, ८३२९५७२७९४, ९४२११४५१६१ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन श्री देवी माऊली युवक कला, क्रीडा,सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे