बांद्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं संजू परब यांचं अभिष्टचिंतन
सावंतवाडी:भाजपचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस आज सावंतवाडीत मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी बांदा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केलं.तसेच पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,माजी सभापती प्रमोद कामत,प्रशांत कामत,भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब,बांदा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत,गुरुनाथ सावंत,ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, अविनाश पंडित,डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई,विणेश गवस,मधुकर देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment