मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे अपघातात दोघे ठार
सावंतवाडी : बांदा येथून कणकवलीच्या दिशेने फटाके घेऊन जात असलेल्या झायलो कारला नेमळे येथे अपघात झाला. टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्याच्या पलीकडे पलटी खाल्ल्याने झालेल्या या अपघातात दोघेजण जागीच ठार तर इतर जखमी झाले.
त्यानंतर स्थानिकांनी संपर्क साधत बांदा येथील 108 रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेत असताना काही अंतरावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. सुदैवाने आतील रुग्ण चालक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले.दरम्यान जळालेल्या रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा प्रचंड मोठा स्फोट होत असल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची भली मोठी रांग लागली आहे.

Comments
Post a Comment