सोनूर्ली मंदिरातील चोरीचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे

 सावंतवाडी : दक्षिण कोकणच प्रति पंढरपूर सोनुर्लीच्या श्री देवी माऊली मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माऊली देवीचं दर्शन घेतले. दरम्यान, मंदीरात झालेल्या चोरीबद्दल दीपक केसरकर यांनी ग्रामस्थांकडून माहिती घेतली. पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांना चोरीच्या तपासाबद्दल विचारपूस केली. यावेळी ग्रामस्थांकडून मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे देवीच्या गाभाऱ्यात झालेल्या चोरीचा तपास जलदगतीने व्हावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी दीपक केसरकर म्हणाले, माऊली देवी ही सर्वांच श्रद्धास्थान आहे. या चोरीचा छडा लावत चोरांना कडक शासन केल जाईल‌. तर माऊली मंदिरातील झालेल्या चोरीचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री तथा पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. हा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले करणार असल्याचे त्यांनी सांगितल. यावेळी पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते. यानंतर ग्रामस्थांकडून मंत्री दीपक केसरकर यांच स्वागत करण्यात आले. यावेळी केसरकर म्हणाले, ज्यावेळी चोरीला गेलेला ऐवज सापडेल, गतवैभव पुन्हा प्राप्त होईल त्यावेळी पुन्हा देवस्थानास भेट देईन.


दरम्यान, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या चोरांना लवकरच गजाआड केल जाईल, चोरीस गेलेल वैभव पुन्हा प्राप्त करून दिले जाईल असे मत व्यक्त केले. तर पोलिस अधिकारी संदीप भोसले यांनी देखील चोरांचा जलदगतीने सुगावा लावत त्यांच्या मुसक्या आवळणार असल्याच स्पष्ट केले.

यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, बांधकाम अधिकारी अनिल आवटी, महावितरणचे श्री. भुरे आदी अधिकारी, शिवसेना नेते अशोक दळवी, माजी नगरसेवक बाबु कुडतरकर, नारायण उर्फ बबन राणे, हरी वारंग, राजन पोकळे, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर, स्थानिक ग्रामस्थ राजेंद्र गावकर,शंकर गावकर,दशरथ गावकर,प्रथमेश गावकर,नागेश गावकर,राज सोनुरलेकर,तेजस गावकर,नवीन गावकर,आमोल गावकर, आनंद गावकर,शिवम म्हापसेकर आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे