बांद्यात चोरट्यांचा धुमाकूळ;दोन वनकर्मचाऱ्यांच्या दुचाकी लंपास
बांदा: शहरातील गवळीटेम्ब येथील भर वस्तीतील ओंकार अपार्टमेंट मधील दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. बांदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओंकार अपार्टमेंट मधील वनरक्षक विष्णू शेशांप्पा नरळे यांच्या मालकीची स्प्लेंडर(एमएच ४५ व्ही ८२३५) किंमत ३० हजार व प्रमोद युवराज जगताप (एमएच ०७ ए ८१८५)इग्नोटर होंडा किंमत ४० हजार अशा ७० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी रात्री चोरीला गेल्या. बुधवारी सकाळी नरळे यांनी पाहणी केली असता दोन्ही दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची खबर बांदा पोलिसांना दिली.दरम्यान बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले,हवालदार सिताकांत नाईक,बाळकृष्ण गवस,प्रशांत पवार यांनी घटनास्थळी जात पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास संजय हुंबे करीत आहेत.
बांदा – वाफोली सीमेवरील गणपती मंदिरातील फंडपेटी चोरीस गेली आहे. मात्र, फंडपेटी चोरी प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान हे चोरटे वाफोली-आंबोली मार्गावरून गेले असल्याचा कयास असून याबाबत तपास सुरू असल्याचे बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सांगितले.

Comments
Post a Comment