बांदा पोलिसांच्या कारवाईत ४ लाख ६० हजारांची दारू जप्त
बांदा:अशोक लेलंड टेम्पोमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध दारू वाहतूक करताना बांदा पोलिसांच्या तपासणी लाठीवर कारवाई करत ४ लाख ६० हजार ८०० रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे,उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रथमेश पवार आणि संजय हुंबे यांनी केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर गोव्यातून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टेंपोला (एमएच ३९ एडी १७०२) हा तपासणीसाठी थांबवण्यात आला.दरम्यान या टेंपोच्या हौद्याची तपासणी केली असता इंप्रियल ब्ल्यू व्हिस्कीचे ५० बॉक्स (किंमत ४ लाख ६० हजार ८००) आढळून आले.ही दारू नाशिक येथे नेण्यात येत होती.याप्रकरणी विशाल रघुनाथ तुपे(सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Comments
Post a Comment