एनएचएम् कर्मचाऱ्यांच्या समस्यां लवकरच निकाली :शिक्षणमंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी:एनएचएम आरोग्य राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली जाईल . आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी काही आरक्षित जागा देऊन टप्प्याटप्प्याने सरळ सेवेत
घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल . तसे प्रयत्न करण्यात येतील , असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एनएचएमच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले . केसरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते . त्यावेळी केसरकर यांची भेट घेऊन संघटना अध्यक्ष हेमदीप पाताडे , सचिव सुवर्णा रावराणे , अजित सावंत , उत्कर्षा गोवेकर , कार्मीस अलमेडा यांनी त्यांना निवेदन दिले . यावेळी नितीन मांजरेकर यांनी केसरकर यांची भेट घडवून आणली . यावेळी जिल्ह्यातील २५० कर्मचारी उपस्थित होते . त्यांनी निवेदनात म्हटले आहे की , आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत विशेष बैठक घेऊन सकारात्मक न्याय मिळावा . आम्ही २००७ पासून जिल्ह्यात ५५६ तर राज्यात २६००० अधिकारी व कर्मचारी विविध पदांवर गाव , तालुका , जिल्हा , राज्यस्तरावर मागील पंधरा वर्षापासून एनएचएम अंतर्गत कार्यरत आहोत . आरोग्य व विभागातील आरोग्याशी संबंधित सुमारे १६ हजार पदे रिक्त आहेत . ग्रामविकास या अनुषंगाने तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने २०१८ मध्ये स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय मंत्री समितीने दिलेल्या अभियानातील निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांना अनुभव व कौशल्याच्या आधारे आरोग्य व ग्राम विकासकडे सरळ सेवेत भरतीत वयाची अट शिथिल करून ४० टक्के जागांचे आरक्षण देण्याबाबत निर्णय झाला आहे . तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मंजूर करून मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीसाठी ठेवल्याचे समजते . आपल्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करून लवकरात लवकर मंत्रिमंडळाची मान्यता द्यावी . आम्ही अधिकारी , कर्मचारी अनुभवी , प्रशिक्षित असल्याने नियमित भरतीत प्राधान्याने विचार करून न्याय मिळवून द्यावा , असे निवेदनात म्हटले आहे . केसरकर यांनी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बैठक बोलावली जाईल .लवकरच तुमचा प्रश्न निघाली काढण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल , असे स्पष्ट केले .

Comments
Post a Comment