राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी स्वच्छता मित्रांसोबत केला वाढदिवस साजरा
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा उद्योग व व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सावंतवाडीच्या सफाईसाठी, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या सफाई मित्रांना जीवनोपयोगी वस्तू पुंडलिक दळवी यांच्या माध्यमातून देत अनोखा उपक्रम राबविला. यानंतर सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वच्छता मित्रांसोबत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सफाई मित्रांना दिलेल्या शुभेच्छांनी पुंडलिक दळवी भारावून गेले. सफाई मित्रांकडून पुंडलिक दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले.
पुंडलिक दळवी यांनी वाढदिनी अनोखा उपक्रम राबविला असून सावंतवाडी शहर सुंदर ठेवण्यासाठी सण, वेळ कळ विसरून तुटपुंज्या पगारात काम करून, एवढे कष्ट करून नेहमी हसतमुख असणाऱ्या सफाई मित्रांचा दिवस गोड करण्यासाठी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.
ज्या कर्मचाऱ्यांमुळे सावंतवाडी शहर स्वच्छ आणि सुंदर आहे त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती. कोरोनात त्यांनी केलेल्या कामाला तोड नव्हती. त्यामुळे त्यांचा गौरव व्हावा या हेतूने सफाई मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला असं मत तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केल.
यावेळी राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, सौ. पुजा दळवी, धोंडी दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, दर्शना बाबर-देसाई, सावली पाटकर,
बाबल्या दुभाषी, राकेश नेवगी, बावतीस फर्नांडिस, इफ्तेकार राजगुरू, संजय वरेरकर, संतोष जोईल, नंदू साटेलकर, प्रकाश म्हाडगूत, आस्पाक शेख, अगस्तीन फर्नांडिस, पालिकेचे अधिकारी वैभव नाटेकर, दिपक म्हापसेकर आदींस सफाई मित्र, न.प. कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment