तुम्ही दिलेल्या प्रेमाचा उतराई होऊ शकत नाही:ना.दीपक केसरकर
सावंतवाडी: समाजाने केलेले कौतुक हे घरचे कौतुक असते भंडारी समाजाचा जाज्वल्य इतिहास आहे.प्रत्येकाने त्याची प्रेरणा त्याची घेतली पाहिजे याच हेतूने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या नावाने सावंतवाडीत जिमखाना मैदानावर पॅव्हेलियन उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
ते सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा आज सावंतवाडीत पार पडला यावेळी ते बोलत होते.
यावेळी लखमराजे सावंत भोसले,नवीनचंद्र बांदिवडेकर,पोलीस निरीक्षक शंकर कोरे,अध्यक्ष जगदीश मांजरेकर,गुरूनाथ पेडणेकर,नितीन मांजरेकर,देवीदास आडारकर बबन राणे आदि उपस्थित होते.
केसरकर म्हणाले,कुडाळ येथे भंडारी समाजासाठी सुसज्ज हाॅस्टेल ची घोषणा मागच्या वेळी मंत्री असताना केली होती.ती आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. भंडारी समाजाचे कार्य मोठे आहे. मी मंत्री होण्यासाठी भंडारी समाज्याचे योगदान मोठे आहे मी यातून उतराई कधीही होऊ शकणार नाही.त्यामुळेच या समाजासाठी जेवढे काही करेन तेवढे कमी आहे.सावंतवाडीत मराठा समाजासाठीचे वस्तीगृह शिवराम राजेच्या नावाने उभारण्यात येणार तर कुडाळ येथे भंडारी समाज सभागृह ज्येष्ठ नाटककार मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने उभारण्यात येईल असेही केसरकर यांनी सांगितले.
भंडारी समाजाचा इतिहास मोठा आहे देशाच्या जडणघडणीत त्यांचा वाटाही मोठा असून अनेक कर्तुत्वान माणसे या समाजाने देशाला दिली आहेत त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने काम केले पाहिजे असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले.त्याची उतराई म्हणून सावंतवाडीत ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या नावाने पॅव्हेलियन उभारण्यात येणार असून त्यातून अनेक क्रिकेटपटू घडतील असे ही केसरकर म्हणाले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून भंडारी समाजातील विद्यार्थो चा गौरव करण्यात आला.

Comments
Post a Comment