बांदा केंद्र शाळेचा सर्वज्ञ वराडकर राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत द्वितीय

बांदा:भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड आयोजित 12 व्या राज्यस्तरीय ऑनलाइन देशभक्ती पर गीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद  बांदा नं.1केंद्रशाळेत इयत्ता दूसरीत शिकणारा सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला‌ .


सर्वज्ञने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले‌ आहे. सर्वज्ञने मिळवलेल्या यशाबद्दल  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर सरपंच अक्रम खान  यांनी अभिनंदन केले . सर्वज्ञला मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर , सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर ,शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे,जागृती धुरी, शितल गवस रंगनाथ परब, जे.डी.पाटील, प्रशांत ‌पवार,गोपाळ साबळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले. सर्वज्ञने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे