जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्यासंदर्भात आ.राणेंची सहकार मंत्र्याशी भेट
सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेले खावटी कर्ज माफ करण्यासंदर्भात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
राज्यात भाजपा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची सत्ता आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भाजपचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह राज्याचे सहकार मंत्री यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खावटी कर्ज माफ करण्यासंदर्भात यावेळी लक्ष वेधण्यात आले. खावटी कर्ज माफ करण्याकरिता सुमारे 24 कोटी रुपयांची गरज असून हा निधी देण्यासंदर्भात या भेटीदरम्यान मागणी करण्यात आली. त्यावर श्री सावे यांनी या संदर्भात संबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी यांच्याशी एकत्रित बैठक घेत निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याची माहिती श्री राणे यांनी दिली.

Comments
Post a Comment