काँग्रेसचे माजी खासदार ब्रि. सुधीर सावंत यांचा शिंदे गटात प्रवेश
तत्कालीन राजापूर मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी बुधवारी मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये त्यांच्या समवेत प्रवेश केला . यावेळी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे , दोडामार्गचे गणेशप्रसाद गवस , सचिन वालावलकर , शैलेश दळवी उपस्थित होते
. काँग्रेस पक्षामधून सुधीर सावंत हे राजापूर मतदारसंघातून १ ९९ १ ला निवडून आले होते . सैन्य दलातून कर्नलपदावरून ते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विनंतीवरून ते राजकारणात आले . त्यानंतर तत्कालीन राजापूर मंतदारसंघासाठी काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केली . जनतेनेही त्यांना खासदार म्हणून निवडून दिले . खासदारकीची टर्म संपल्यानंतर ते पुन्हा सैन्यदलात सक्रिय झाले . यानंतर त्यांना ब्रिगेडियर म्हणून पदोन्नती मिळाली . कारगील युद्धात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली . सेनादलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणाऐवजी शेतकरी व माजी सैनिकांसाठी काम सुरू केले . सैनिक नागरी सहकारी पतसंस्था , आंबोली येथील सैनिक स्कूल , सिंधुदुर्गनगरी येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी महाविद्यालय आदी संस्था त्यांनी सुरू केल्या . यामुळे जिल्ह्यातील माजी सैनिकांची एक वेगळी व्होट बँक त्यांनी तयार केली आहे . दरम्यान , काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मायावती यांच्या बहुजन समाज पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केला होता . त्यानंतर स्वत : चा शिवराज्य पक्षही स्थापन केला होता . काही काळाने ते पुन्हा काँग्रेसम ध्ये परतले होते . मात्र , काही तात्विक विरोधामुळे त्यांनी पुन्हा काँग्रेसपासून फारकत घेतली.दरम्यान ते अरविंद केजरीवाल यांच्या ' आप ' पक्षांत जाणार अशी चर्चा होती . मात्र , गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून काहीसे अलिप्त होते . असे असताना बुधवार २४ ऑगस्ट रोजी त्यांनी मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटांमध्ये अचानक प्रवेश केला . ब्रि . सुधीर सावंत यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल , असे आश्वासन ना . केसरकर यांनी यावेळी दिले . ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत शिंदे गटात सहभागी होतील , असा कयास आहे .
यावेळी गणेशप्रसाद गवस,राजन पोकळे,शैलेश दळवी,सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment