सावंतवाडीत दहीहंडीचा थरार : पाच थरांची सलामी

सावंतवाडी:  गोविंदा रे गोपाळाच्या, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा" च्या जयघोषात डीजे च्या तालावर  सावंतवाडीत दहीहंडी उत्सव साजरा झाला.

तब्बल दोन वर्षांच्या ब्रेकनंतर गोविंदा मैदानात उतरला. सावंतवाडीतील अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाच्या माध्यमातून चार थरांची दहिहंडी फोडत दहीहंडी उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. हा सोहळा व दहीहंड्यांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. 


     दहीहंडी उत्सवाच्या सुरुवातीला सालईवाडा येथील  संस्थानकालीन मुरलीधर मंदीर इथं धार्मिक कार्यक्रमासह आरती करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमेय तेंडोलकर यांच्या वडीलांच नुकतच निधन झाल्यानं त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मानाची दहिहंडी फोडण्यात आली. यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेत असताना चौकाचौकातील दहिहंड्या फोडण्यात आल्या. यावेळी मोठ्या जल्लोषात हे गोविंदा पहायला मिळाले.

     यावेळी माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकुर, देव्या सुर्याजी, ॲड. अतु्ल केसरकर, अर्चित पोकळे, सनी जाधव, मयूर लाखे, महेश पाटील, अविनाश पाटील, युवराज नाईक, राकेश लाखे, धीरज लाखे, अरुण घाडी, मयूर लाखे, महेश पाटील, अविनाश पाटील, युवराज नाईक, राकेश लाखे, धीरज लाखे यांसह अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचे गोविंदा उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे