शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या 'स्वराज्य महिला' दहीहंडी उत्सव सोहळा थाटात
मालवण,ता.२२: शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्यावतीने आयोजित स्वराज्य महिला दहीहंडी उत्सव सोहळा यतीन खोत यांच्या निवासस्थान परिसरात मोठ्या उत्साहात झाला.
महिला वर्गाच्या आग्रही मागणीनुसार शिल्पा खोत यांनी पुढाकार घेऊन पहिल्यांदाच आयोजित केलेल्या महिला दहीहंडी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी शिल्पा खोत यांच्यासह चारुशीला आढाव, प्रतिभा चव्हाण, अश्विनी आचरेकर, साक्षी मयेकर, शांती तोंडवळकर, चित्रा सांडव, स्वाती तांडेल, पूजा तळाशिलकर, रूपा कांदळकर, दीपा पवार, कृपा कोरगावकर, अनुष्का कांबळी, सायली कांबळी, निकिता तोडणकर, दिया पवार, श्रुती धुरी, विद्या चव्हाण, व इतर महिला यावेळी सहभागी झाल्या होत्या.
लायन्स क्लब अध्यक्ष वैशाली शंकरदास व पदाधिकारी तसेच चाची हडकर यांच्याकडून १० हजार १११ रुपयांचे पारितोषिक तीन थर लावून दहीदांडी फोडणाऱ्या महिला भगिनींना देण्यात आले. यावेळी बाल चमुनीही धमाल मजा मस्ती केली. कृष्णच्या वेशभूषेत साहिल नितीन तोडणकर व अन्य बच्चे कंपनी उपस्थित होती.

Comments
Post a Comment