बांदा येथील भीषण अपघातात एक ठार
बांदा:मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात हुंडाई ओरा कारमधील एक जण ठार झाला आहे.मनीष कुमावत(२७,रा.इंदोर) असावं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर त्याच्यासोबत असलेली मैत्रीण मेघा कारवा २५ ही जखमी झाली
आहे.तर चालक शशांक दुबे २१ सीटबेल्ट लावल्याने सुदैवाने बचावला आहे.हा अपघात एवढा भीषण होता की कार गोव्याच्या दिशेने जात होती ती अपघातानंतर पुन्हा सावंतवाडीच्या दिशेने पलटी होऊन उभी राहिली.गाडी डीवायडर वरून थेट विरुद्ध दिशेने रस्त्यावर पलटी झाली.त्यामुळे पाठीमागे बसलेला मनीष दरवाजातून बाहेर फेकला जात डोक्यावर रस्त्यावर आपटला.दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी मदत करत जखमी मनिषला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.मात्र मेंदूला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

Comments
Post a Comment