दोडामार्ग शहराच्या विकासासाठी आवश्यक सर्व निधी देणार:दीपक केसरकर
दोडामार्ग:दोडामार्ग शहराच्या विकासासाठी आवश्यक तो सर्व निधी देण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आगळेवेगळे शहर म्हणून दोडामार्ग शहर पुढे येण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल , अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी येथे दिली . नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी उभारलेल्या श्री साईबाबा मंदिरात पुन : प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी केसरकर हे खास दोडामार्गात आले होते . त्यावेळी ते बोलत होते .
येथील बसस्थानकासमोरील या साई मंदिरात चेतन चव्हाण यांनी साईबाबा मूर्तीची पुन : प्रतिष्ठापनातसेच होमहवन , पूजाअर्चा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते . त्यांच्या निमंत्रणाच्या अनुषंगाने मंत्री केसरकर रविवारी दुपारी दोडामार्गात दाखल झाले . यावेळी चव्हाण व त्यांचे नगरसेवक , मित्रमंडळ परिवार कुटुंबीय आदींनी केसरकर यांचे स्वागत केले . यावेळी शिवसेनेचे दोडामार्ग शहरप्रमुख लवू मिरकर , योगेश महाले , बांधकाम सभापती नितीन मणेरीकर , समीर रेडकर , सुनील गवस आदीनी केसरकर यांचे- स्वागत केले . तसेच जि . प . च्या माजी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ . अनिशा दळवी यांनीही केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . शहरासाठी भरीव - निधी देणार - केसरकर गोवा राज्याच्या प्रवेशद्वारावर व महाराष्ट्राच्या / सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले दोडामार्ग शहर झपाट्याने विस्तारीकरणाकडे वाटचाल करत आहे . ते लक्षात घेता भविष्यातील या शहराची विकास प्रक्रिया लक्षात घेता शहराच्या सर्व विकासकामांसाठी येथील नगरपंचायत तसेच अन्य विभागांना विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल , असेही केसरकर यांनी सांगीतले .

Comments
Post a Comment