जनतेचा आशीर्वाद आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यामुळेच हे शिवधनुष्य पेलू शकलो:पुंडलीक दळवी

 सावंतवाडी: माझ्या आयुष्याची सुरुवात संघर्षातून झाली आहे. तशी सवय असल्यामुळेच मी जीवनात यशस्वी झालो. राष्ट्रवादीत प्रवेश करताना सुद्धा केवळ चार-पाच कार्यकर्तेच माझ्यासोबत होते. मात्र पक्षाची जबाबदारी मी यशस्वी हाताळली. त्यामुळेच आज मला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली, असा विश्वास राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान माझा पिंड मुळात समाजकारणाचा होता. मात्र नकळत मी राजकारणात आलो. तरीसुद्धा माझे समाजकार्य मी प्रभावीपणे सुरू ठेवले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. दळवी यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी दळवी यांच्या पत्नी सौ. पूजा दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, उद्योग-व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, तालुका सरचिटणीस काशिनाथ दुभाषी, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक ईफ्तीकार राजगुर,माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, शहर चिटणीस राकेश नेवगी, रत्नागिरी जिल्हा महिला निरीक्षक सौ.दर्शना बाबर-देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, महिला शहर अध्यक्ष सायली दुभाषी, महिला तालुकाध्यक्ष सौ. रिद्धी परब, आशिष कदम, सत्यजित धारणकर, संजय देसाई, प्रदीप चांदेलकर, सावंतवाडी भाजप मंडळ अध्यक्ष अजय गोंदवळे, बंटी राजपूरोहित आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि मित्रपरिवार उपस्थित होता.


श्री. दळवी पुढे म्हणाले, माझे आयुष्य संघर्षातून गेले आहे. मी संघर्ष करून यश मिळवले. वेळप्रसंगी मी फुटपाथवर झोपून सुद्धा दिवस काढले. त्यामुळेच आज मला चांगले दिवस पाहायला मिळाले. त्यासाठी मला मित्रांचे सुद्धा सहकार्य लाभले. अशा सर्व मित्र परिवाराचा मी ऋणी आहे. अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले, मुळात संघर्षाचीच सवय असल्यामुळे मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. अनेक मोठे पक्ष आपल्याला बोलवत होते. मात्र संघर्ष करण्याच्या आवडीमुळेच मी राष्ट्रवादीची धुरा हातात घेतली. त्यावेळी केवळ हाताच्या बोटावर मोजणी इतकेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते. मात्र आज ती परिस्थिती या ठिकाणी राहिली नाही. आजची गर्दी ही माझ्या यशस्वी वाटचालीचे प्रतीक आहे. अशीच साथ मला सर्वांनी कायम द्यावी, अशी सद्भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे