बांदा सरपंच अक्रम खान यांच्या शिष्टाईने भोगले यांचे उपोषण स्थगित
बांदा :बांदा शहरातील निमजगा, गवळीटेम्ब, गडगेवाडीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी उपोषण केले. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतर्गत उभारण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत ग्रामस्थ वासुदेव विजय भोगले यांनी केला. ग्रामपंचायत प्रशासनाने या योजनेतील त्रुटीची पूर्तता २० सप्टेंबर पर्यंत करण्याचे लेखी आश्वासन सरपंच अक्रम खान यांनी दिल्याने भोगले यांनी उपोषण दुपारी मागे घेतले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१४-१५ नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली असून याचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत या योजनेचा तिन्ही वाडीतील लोकांना लाभ घेता नसून यामध्ये अनेक त्रुटी आढळत आहेत. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा भोगले यांचा आरोप आहे.
स्थानिक नागरिक या योजनेपासून वंचित असून यासाठी या योजनेतील दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व स्थानिकांना न्याय द्यावा या मागणीसाठी भोगले यांनी सकाळी उपोषण सुरु केले.
दुपारी सरपंच अक्रम खान, ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीना मोर्ये यांनी भेट घेऊन चर्चा केली. या योजनेतील त्रुटीची पूर्तता २० सप्टेंबर पर्यंत करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी वाडीतील ग्रामस्थ हेमंत दाभोलकर, शरद सावंत, तनुजा वराडकर, शामसुंदर धुरी, विलास बांदेकर, भूषण सावंत, बेनक सावंत, दत्तगुरु म्हाडगुत, कमलाकर नाईक, मंदार केसरकर, श्रीप्रसाद बांदेकर, सुशांत वराडकर, गणेश सावंत, शिवराम बहिरे, अमोल धुरी, मोहसिन खान, विलास बांदेकर, रघुनाथ सावंत, विष्णू निगुडकर, भूषण सावंत, संदेश महाले, प्रसाद बांदेकर, रामदास हुमरसकर आदी उपस्थित होते.
यावेळी भोगले यांनी तिन्ही वाडीतील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्न असूनही प्रभागातील एकही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तात्काळ करावी अशी मागणी केली.

Comments
Post a Comment