आजगाव केंद्रशाळा नं.१ मधील आयोजित वेशभूषा स्पर्धेत चिन्मय कोटणीस,सौम्या गोवेकर प्रथम
सावंतवाडी: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजगाव केंद्रशाळा नं. १ येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेत लहान गटात चिन्मय कोटणीस तर मोठ्या गटात सौम्या गोवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघाच्यावातीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांमध्ये देशभक्ती, देशप्रेम याबद्दल प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या देशभक्त, क्रांतीकारकाची वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एकापेक्षा एक अशी सरस कामगिरी मुलांनी केली. या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे – पाचवी ते सातवी गट प्रथम- चिन्मय विक्रम कोटणीस, द्वितीय- कनक दीनानाथ काळोजी, तृतीय – नील नितीन बांदेकर, तर उत्तेजनार्थ – नैतिक निलेश मोरजकर, शमिका राजन आरावंदेकर. इयत्ता आठवी ते दहावी गट, प्रथम – सौम्या यशवंत गोवेकर, द्वितीय – श्रावणी राजन आरावंदेकर , तृतीय – संघवी मोहन जाधव तर उत्तेजनार्थ पारितोषिक दीक्षा प्रदीप काकतकर, पारद शंकर पेडणेकर यांना मिळाला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना संघामार्फत रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात आजगाव सरपंच सुप्रिया वाडकर-मेस्त्री व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी संघ आजगावचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झाट्ये, सचिव विलासनंद मठकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत काकतकर, परीक्षक मंगेश कांबळी, परीक्षक अशोक तेंडोलकर, सूर्यकांत आडारकर , विनायक उमर्ये , सूरज आजगावकर , मुख्याध्यापक आजगाव नं . १ ममता जाधव , दत्तगुरु कांबळी , रुपाली नाईक , वर्षा गवस , उत्तम भागीत, आजगाव हायस्कूल मुख्याध्यापक आणि सर्व माजी विद्यार्थी संघाचे सदस्य यांचे सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज आजगावकर तर आभार सूर्यकांत आडारकर यांनी केले. या स्पर्धेसाठी विद्यार्थी , पालक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment