आ.वैभव नाईक यांचे मानले व्यायाम पटूंनी आभार

 मालवण:शहरात अत्याधुनिक व्यायामशाळा व्हावी, तसेच याठिकाणी अद्यावत मशिनरी, साहित्य मिळावे यासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्याकडे केल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्यातून आमदार वैभव नाईक यांनी व्यायाम साहित्य व मशीनरी उपलब्ध करून दिल्या बद्दल जिम मधील सदस्यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.


मालवण नगरपरिषदेच्या इमारतीतील व्यायामशाळेत अत्याधुनिक व्यायाम साहित्य मिळावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. आवश्यक साहित्य, मशीनरी नसल्याने व्यायाम करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील व्यायामशाळेसाठी आवश्यक साहित्य मिळावे, अशी मागणी व्यायामपट्टूमधून करण्यात येत होती. अखेर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. आमदार नाईक यांनीही तात्काळ २५ लाखाचा निधी देण्याचा शब्द दिला. याची पूर्तता झाली असून सर्व आवश्यक साहित्य, मशीनरी व्यायाम शाळेत उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत तसेच माजी बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक पंकज सादये यांच्यासह अन्य नगरसेवक आणि नगरपालिकेच्या अधिकारी वर्गाचे व्यायाम शाळेतील सदस्यांनी आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे