...अन्यथा दोडामार्ग स्थानकातून एकही एसटी सुटू देणार नाही:बाबुराव धुरी
दोडामार्ग:दोडामार्ग तालुक्यातील अती दुर्गम असलेल्या विर्डी गावात वझरे येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे एस टी बस फेरी बंद करण्यात आली होती मात्र आता पुलाचे काम पूर्ण झाले असून आवश्यक ती रस्त्याची डागडुजीही करण्यात आली आहे, मात्र अजूनही एस टी बस फेरी गावात सुरू नसल्याने विर्डी वासीयांचे हाल होत आहेत ही बस फेरी २५ ऑगस्ट पासून सुरू न झाल्यास २६ ऑगस्ट पासून दोडामार्ग लबस स्थानाकावरुन सुटणारी एकही बसफेरी सोडू देणार नसल्याचा इशारा शिवसेना उप जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक नियंत्रकाना दिला आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सदरची बस फेरी सुरू व्हावी यासाठी वाहतूक नियंत्रक यांना सरपंच व बांधकाम विभाग यांनी पत्र दिले असून त्यात हा रस्ता वाहतुकीस योग्य असल्याचे म्हटले आहे त्यामुळे ही बसफेरी त्वरित सुरू व्हावी असेही त्यानी म्हटले आहे.

Comments
Post a Comment